24.2 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeलातूरहेल्दी फूड फिएस्टा स्पर्धा

हेल्दी फूड फिएस्टा स्पर्धा

एकमत ऑनलाईन

लातूर : दयानंद विज्ञान महाविद्यालयात जागतिक आरोग्य दिनानिमित्त ‘हेल्दी फूड फिएस्टा या स्पर्धेचे आयोजन जैवतंत्रज्ञान विभागातर्फे करण्यात आले होते. या स्पर्धेत महाविद्यालयातील २५ विद्यार्थ्यांनी सहभाग दर्शवून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ‘हेल्दी फूड फिएस्टा स्पर्धेचे उद्घाटन दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी सचिव रमेश बियानी, प्राचार्य डॉ. जयप्रकाश दरगड, प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड, प्राचार्य डॉ.संतोष सूर्यवंशी, प्रा. काकडे, प्रा. दळवी, डॉ. कर्पे, डॉ. लोहगावकर,उपप्राचार्य डॉ. दिलीप जगताप, डॉ. मिलिंद माने, प्रा. बळवंत सूर्यवंशी, डॉ. राहुल मोरे, पसारकर आदी उपस्थित होते.

स्पर्धेतील विद्यार्थ्यांनी विविध सकस आहारातील पदार्थ बनवून सर्व्ह अ‍ॅड. अर्न याबाबतीत जागरूक होत कौशल्य विकास व काळाची गरज लक्षात घेता स्वत: बनविलेल्या पदार्थातील विविध घटक व त्यांचे शरीरावर होणारे उपयोग याबाबत सविस्तर असे सादरीकरण केले. विद्यार्थ्यांमध्ये उद्योगाची खास रुची निर्माण व्हावी तसेच त्यांना पौष्टिक अन्नपदार्थ व अन्नप्रक्रियाचे ज्ञान मिळावे यासाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धेसाठी डॉ. कोमल गोमारे, प्रा. पूजा नागिमे, तसेच परीक्षक म्हणून प्रा. मेघा पंडित, डॉ. महेश बेंबडे आणि डॉ. रोहिणी शिंदे यांनी काम पाहिले. विद्यार्थ्यांनी सब्जा सरबत, ल्ािंबू शिकंजी, मेक्सिकन ब्रुसेल्स स्प्राऊट सलाड, व्हेजिटेबल सॅन्डविच, एनर्जी ड्रिंक अँड फ्लेक्स सीड, उडदाचे लाडू, स्रो मॅन त्रफल, लींसीड लड्डू, चिकपी चाट इत्यादी विविध पौष्टिक पदार्थ बनविले होते. या सर्व पदार्थाची पाहिणी उपस्थित मान्यवरांनी करून मार्गदर्शन केले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या