37.3 C
Latur
Saturday, May 28, 2022
Homeलातूरागर पंचायत अध्यक्षपदाची आरक्षण सोडत उद्या मुंबईत होणार

ागर पंचायत अध्यक्षपदाची आरक्षण सोडत उद्या मुंबईत होणार

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
राज्यातील १३९ नगर पंचायतींच्या नगराध्यक्ष पदाचे निश्चितीसाठी आरक्षणाची सोडत गुरुवार, दि. २७ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता मंत्रालय, मुंबई येथे प्रधान सचिव ( नवि-२) यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केली आहे.

सद्यस्थितीत कोविड-१९ च्या संक्रमणामुळे विहीत केलेले आयोग्य विषयक निकष विचारात घेता, या सोडतीसाठी संबंधित अधिकारी, लोक प्रतिनिधींनी मंत्रालयात उपस्थित राहण्याऐवजी संबंधित विभागीय आयुक्त कार्यालयात उपस्थित रहावे. या सोडतीसाठी ऑनलाईन उपस्थित राहण्यासाठी आपल्या कार्यालयात दुरदृष्यप्रणाली (व्हीडीओ कॉन्फरन्स व्ही. सी.) ची व्यवस्था करावी. तसेच या सोडतीसाठी विभागीय आयुक्त कार्यालयातील अधिकारी, जिल्हा प्रशासन अधिकारी व आपल्या विभागातील नगर पंचायतीच्या कार्यक्षेत्रात दहा लोक प्रतिनिधींना ऑनलाईन पध्दतीने विभागीय आयुक्त कार्यालयात उपस्थित राहण्याबाबत कळविण्यात यावे, असे नगर विकास विभागाच्या उपसचिव प्रियंका कुलकर्णी-छापवाले यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या