24.4 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeलातूर११ जणांच्या आंतरजिल्हा टोळीविरुद्ध मोका

११ जणांच्या आंतरजिल्हा टोळीविरुद्ध मोका

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
मार्च २०२२ रोजी पोलिस ठाणे चाकूर येथे चापोली शिवारातील दाखल असलेल्या खून व खुनाचा कट करणा-या तसेच अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेल्या आंतरजिल्हा टोळीविरुद्ध मोका कायद्याप्रमाणे दोषारोपपत्र पाठवण्यास अपर पोलिस महासंचालक महाराष्ट्र राज्य कायदा व सुव्यवस्था यांचेकडून अंतिम मंजुरी मिळाली असून पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलिस अधीक्षक अनुराग जैन यांचे सखोल मार्गदर्शनात तपासी अधिकारी, चाकूर उपविभागीय पोलिस अधिकारी तथा सहायक पोलिस अधीक्षक निकेतन कदम व त्यांच्या टीमच्या सखोल व कसोशीने केलेल्या तपासाला यश आले आहे. संघटित गंभीर गुन्हे करणा-या गुन्हेगारांच्या विरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाई ही लातूर जिल्ह्यातील जवळपास बारा वर्षानंतरची पहिलीच कारवाई आहे.

चाकूर पोलिस ठाणे हद्दीतील चापोली शिवारात २० मार्च २०२२ रोजी खुनाचा गुन्हा, गुन्हा रजिस्टर क्रमांक ९७/२०२२ कलम ३०२, १२० (ब), २०१, २१२, २१६, ३४ भादवी प्रमाणे दाखल झाला होता. पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, चाकूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी निकेतन कदम यांचे आदेश व मार्गदर्शनाप्रमाणे चाकूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बालाजी मोहिते व पोलिस अंमलदार यांनी तपास करून गुन्ह्यातील मुख्य आरोपी व सूत्रधार असलेला नारायण तुकाराम इरबतनवाड (४५ रा. शिरूर ताजबंद, ता.अहमदपूर) यांच्यासह इतर ११ ज्यामध्ये १० आरोपी आणि १ विधी संघर्ष बालक निष्पन्न झाले. सर्व आरोपींनी सदरचा गुन्हा केल्याचे कबूल केले.

आरोपींना कोर्ट मंजुरीने अटक करून त्यांच्याकडून गुन्ह्या बाबत सखोल तपास केला असता या गुन्ह्यातील आरोपी टोळी करून टोळीने गुन्हे करणारे तरबेज व सराईत धाडसी व कुख्यात सक्रिय गुन्हेगार असून त्यांनी लातूर जिल्ह्यातील पोलिस ठाणे गांधी चौक, पोलिस ठाणे अहमदपूर व चाकूर तसेच नांदेड जिल्ह्यातील पोलिस ठाणे मुखेड हद्दीत स्वत:च्या आर्थिक लाभासाठी, संघटितपणे, वेगवेगळे साथीदार घेऊन टोळी निर्माण केली. त्यांनी हिंसाचाराचा वापर व कट करून जीवे मारणे, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे, बेकायदेशीर जमाव जमवून घातक हत्याराने दुखापत करणे, अवैधपणे अफूची तस्करी करणे यासारखे गंभीर गुन्हे करून दहशत निर्माण करून अवैध सावकारीच्या माध्यमातून स्वत:चे व टोळीतील साथीदाराचे आर्थिक फायदा करिता गुन्हे करतात.

तसेच सर्वसामान्य जनतेमध्ये दहशत निर्माण करून लोकांच्या जीवितास व मालमत्तेस धोका निर्माण करणे, स्वत:चा व सोबतच्या साथीदारांचा आर्थिक फायदा करण्यासाठी स्वत:ला भाई, दादा सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असल्याचे निष्पन्न झाल.े संघटित गुन्हे करणा-या या आरोपींच्या टोळी विरुद्ध पोलिस उपमहानिरीक्षक निसार तांबोली यांच्याकडे मोक्का कायद्यान्वये वाढीव कलमे लावण्याबाबत प्रस्ताव पोलिस अधीक्षकांच्या मार्फत पाठवून त्यास मोक्का लावण्याची पूर्वपरवानगी प्राप्त झाल्यानंतर पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस अधीक्षक निकेतन कदम हे करीत होते. गुन्ह्याच्या तपासामध्ये तपासी अधिकारी उपविभागीय पोलिस अधिकारी कदम व तपास पथक यांनी कसोशीने तपास करून आरोपीचे गुन्ह्यांचे पूर्व रेकॉर्ड संकलित करणे, आरोपींच्या स्थावर व जंगम मालमत्तेची माहिती संकलित केले.

तसेच सराईत आरोपी नारायण तुकाराम इरबतनवाड यांच्यासह टोळीतील इतर आरोपींचा राज्यातील विविध ठिकाणी तसेच देशातील ७ विविध राज्यात पाठलाग व शोध घेऊन त्यांना सीताफिने अटक करून गुन्ह्यामध्ये निष्पन्न करून आरोपींता विरुद्ध भक्कम व सबळ पुरावा गोळा करून दोषारोपपत्र मंजुरी करता अपर पोलिस महासंचालक मुंबई यांच्याकडे पाठवले होते. त्यानुसार अपर पोलिस महासंचालक कुलवंत कुमार सारंगल यांनी सराईत आरोपी नारायण तुकाराम इरबतनवाड यांच्यासह इतर आरोपी विरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम प्रमाणे दोषारोप पाठविणेस मंजुरी दिली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या