लातूर : प्रतिनिधी
लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, दयानंद महाविद्यालय, साळेगल्लीतील यशवंत प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र व छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था या चार केंद्रांवर १२ ते १४ वर्षे वयोगटासाठी मोफत लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे.
लातूर जिल्ह्यासह लातूर शहरातही कोरोनाचा प्रादुर्भाव ब-यापैकी ओसरला आहे. तरीही प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात १२ ते १४ वर्षे वयोगटासाठी कोर्बेव्हॅक्सीचा पहिला डोस, १५ ते १८ वर्षे वयोगटासाठी कोव्हॅक्सिनचा पहिला व दुसरा डोस, दयानंद महाविद्यालय व यशवंत प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रात कोर्बेव्हॅक्स व कोव्हीशिल्ड आणि कोव्हॅक्सीन ऑनलाईन व ऑनस्पॉट डोस देण्यात येणार आहे. विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, दयानंद महाविद्यालय व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत उपरोक्त दोन डोससह १८ वर्षाच्या पुढील कोव्हिशील्ड पहिला व दुसरा डोस कोव्हॅक्सिन दुसरा आणि दोन डोस घेऊन नऊ महिने म्हणजेच ३९ आठवडे पुर्ण झालेल्यांना प्रिकॉशन डोस देण्यात येत आहे.
प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र राजीवनगर, प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र प्रकाशनगर, प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र इंडियानगर, प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र गौतमनगर, स्त्री रुग्णालय लेबर कॉलनी(फक्त गर्भवती मातांसाठी), प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र मंठाळेनगर, प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र बौद्धनगर पंडित जवाहरलाल नेहरुन मनपा रुग्णालय पटेल चौक (दुपारी १२ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत), गायत्री हॉस्पिटल, सिद्धीविनायक हॉस्पिटल औसा रोड, केंद्रे हॉस्पिटल जुना रेणापुर नाका कोव्हिशील्ड, कोव्हॅक्सिन १५ ते १८ वर्षे, १८ वर्षांपुढील नागरीकांसाठी पहिला व दुसरा डोस तसे प्रिकॉशन डोस देण्यात येत आहे.