26.7 C
Latur
Friday, December 3, 2021
Homeलातूर१४ कोटींच्या खर्चातून विविध कामे होणार

१४ कोटींच्या खर्चातून विविध कामे होणार

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
अमृत पाणीपुरवठा योजनेतून शिल्लक राहिलेल्या १४ कोटी रुपयांच्या रक्कमेतून लातूर शहराच्या पाणीपुरवठा योजनेचे बळकटीकरण करण्यास महानगरपालिकेने सुरुवात केली आहे. त्यामुळे येणा-या नवीन वर्षापासून पाणीपुरवठ्यात योणरे व्यत्यय टाळण्यास महानगरपालिकेला मदत होऊन शहराला व्यवस्थित पाणीपुरवठा करणे शक्य होणार आहे.

लातूर शहराला पाणीपुरवठा होणा-या धनेगाव येथील मांजरा धरणावरील पंप हे जुने झाले आहेत. १५ वर्षांपुर्वी हे पंप बसविण्यात आलेले आहेत. तसेच हरंगुळच्या जलशुद्धीकरण केंद्रावरीलदेखील पंपाची अशीच अवस्था आहे. याचा परिणाम पाणीपुरवठ्यावर सातत्याने होत आहे. त्यामुळे अमृत योजनेतील १४ कोटी रुपये शिल्लक होते. तो निधी शासनाला परत जाऊ नये, याकरिता महापौर विक्रांत गोजमगुंडे, उपमहापौर चंद्रकांत बिराजदार, आयुक्त अमन मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली शासनास प्रस्ताव पाठवण्यात आला होता. त्यात नवीन कामेही प्रस्तावित करण्यात आली होती.

शासनाने त्या प्रस्तावास मंजूरी दिल्याने ही कामे सुरु झाली आहेत. यात शहरात १० कोटी ३९ लाख रुपये खर्च करुन ६२ किलोमीटर जलवाहिनी, ठिकठिकाणी व्हॉल्व्ह, क्रॉस क्नेक्शन दिले जाणार आहेत. तसेच मांजरा धरणावर ७०० एचपीचे दोन पंप व हरंगुळ जलशुद्धीकरण केंद्रावर ४०० एचपीचे दोन पंप बसवले जाणार आहेत. त्याच्या वर्कऑर्डर दिल्या आहेत. सबस्टेशनही नवीन केले जाणार आहेत. हरंगुळ जलशुद्धीकरण केंद्र ते हरंगुळ रेल्वे स्टेशनजवळ असलेल्या संतुलित पाण्याच्या टाक्यांपर्यंत दीड किलोमीटर नवीन जलवाहिनी टाकली जाणार आहे. ही कामे झाल्यानंतर नवीन वर्षापासून शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होण्यास मदत होणार आहे. सध्या ही सर्वच कामे प्रगतीपथावर आहेत.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या