24 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeलातूर२६४४ एकल कलावंत मानधनापासून वंचित !

२६४४ एकल कलावंत मानधनापासून वंचित !

एकमत ऑनलाईन

लातूर : योगीराज पिसाळ
शासनाने कोरोनाच्या पार्शवभूमीवर कलाकारांना अर्थसहाय्य देण्यासाठी एकल कलावंतांच्याकडून अर्ज मागवले होते. लातूर जिल्हयातून ३ हजार ३५१ एकल कलावंतांनी मानधनासाठी अर्ज केले होते. त्यापैकी २ हजार ६४४ एकल कलावंत छानणीत अपात्र ठरल्याने मानधनापासून वंचित राहिले आहेत. तर ७०७ एकल कलावंत जिल्हयातून पात्र ठरले आहेत.

कोरोना कालावधीत अनेक कलावंतांना आपल्या कलेचे सादरीकरण करता आले नाही. त्यांची आर्थिक कुचंबना होऊ नये म्हणून महाराष्ट्र शासन पर्यटन व संस्कृतीक कार्यविभागांच्या शासन निर्णयान्वये राज्यातील एकल कलावंतांना ५ हजार रुपये मानधन देण्याचे निर्देश होते. त्यानुसार लातूर जिल्हयास १ हजार ५०० एकल कलावंतांचे उदिष्ट देण्यात आले होते. त्यानुसार जिल्हयातील प्रत्येक तहसिल कार्यालयाच्या स्तरावर एकल कलावंतांचे अर्ज संकलनाचे काम संकलीत झालेले ३ हजार ३५१ अर्ज लातूर जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाकडे पाठवण्यात आले. या आलेल्या सर्व अर्जांची छानणी करण्यात आली. सदर योजनेचा कालावधी हा ३० मार्च पर्यंत होता.

या अर्जातून कलावंताने कला क्षेत्रात किमान १५ वर्ष काम केल्याचा पुरावा, तहसिलचे ४८ हजार रूपये उत्पनाचे प्रमाण पत्र, केवळ कलेवर गुजरान असणा-या आर्थिक दृष्टया दुर्बल कलाकार आदी निकषात बसणा-या ७०७ एकल कलावंतांची निवड करण्यात आली. तर उत्पन्नाचे प्रमाणपत्र नसणे, कलेच्या सादरीकणाचे पुरावे नसणे आदी कारणामुळे तब्बल २ हजार ६४४ एकल कलावंतांचे अर्ज अपात्र ठरले होते. अपात्र कलावंताना कागद पत्रांची पूर्तता करण्याठी पाच दिवसाचा कालावधी दिला होता. लातूर जिल्हयातून पात्र झालेल्या ७०७ एकल कलावंतांना ५ हजार रूपये मानधनाचा लाभ मिळणार आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या