लातूर : प्रतिनिधी
कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या वारसांना ५० हजार रुपयांची मदत देण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला. या आदेशानूसार मदत देण्याचा निर्णय राज्यातील महाविकास आघाडी सरकारने घेतला व तसे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले. लातूर जिल्हा प्रशासनाने अर्ज मागविण्याची प्रक्रीया करुन आतापर्यंत जिल्ह्यातील २ हजार ३०० वारसांना प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत दिली आहे.
लातूर जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाला तेव्हापासून आजपर्यंत कोरोनामुळे २ हजार ४६० नागरिकांचा मृत्यू झालेला आहे. मृत्यू झालेल्या नागरिकांच्या वारसाला ५० हजार रुपये अनुदान देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकारने राज्यातील सर्व जिल्हा प्रशासनाला मदत देण्यासंदर्भात निर्देश दिले आहेत. लातूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने ूङ्म५्र-ि19१ी’्रा.्रल्ल या संकेतस्थळावर अर्ज मागविण्यात आले. अर्ज पडताळणीनंतर अर्ज फे टाळला तरी तक्रार निवारण समितीकडे सर्व कागदपत्रांसह दाद मागता येईल. त्यानंतर सुनावणी होईल व सुनावणीअंती जो निर्णय होईल, त्यानूसार शासनाची मदत मिळेत, असे सांगण्यात आले होते. जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या २ हजार ४६० असली तरी मदतीसाठी मात्र ३ हजार ३०० अर्ज प्राप्त झाले. यात काही अर्ज डबल आहेत. त्यामुळे लाभार्थींच्या अर्जांचा आकडा वाढलेला आहे.
कोरोनाने मृत्यू झालेल्यांच्या वारसांचे ३ हजार ३०० अर्ज प्राप्त झाले. त्यात सर्वाधिक अर्ज हे लातूर शहरातील आहेत. ग्रामीण भागातून आलेल्या अर्जांची तपासणी जिल्हा शल्य चिकित्सकांकडे आहे. शहरातील अर्जांची तपासणी महानगरपालिकेच्या आरोग्य अधिका-यांकडून करण्यात येत आहे. आतापर्यंत २ हजार ३०० वारसांना मदत देण्यात आली आहे. शासनाची ही मदत वारसांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आली आहे.