37.8 C
Latur
Wednesday, May 25, 2022
Homeलातूर४० लाखांचा गुटखा चोरला

४० लाखांचा गुटखा चोरला

एकमत ऑनलाईन

लातूर :प्रतिबंधित असलेला ८४ लाख रूपयांचा गुटका जप्त केल्या प्रकरणी १० ऑक्टोबर २०२१ रोजी अन्नसुरक्षा अधिकारी यांच्या फिर्यादी वरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला होता. सदर गुटका एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गोडावून मध्ये ठेवला होता. या गोडावून मधला ४० लाख १५ हजार रूपयांचा गुटका चोरून नेल्याची बाब उघड झाल्यानंतर १३ जणांच्या विरोधात २१ जानेवारी रोजी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा झाला आहे. या घटनेच्या अधिक तपासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.

पोलीस स्टेशन एमआयडीसी येथे जप्त मुद्देमाल जास्त असल्याने ठेवण्यासाठी जागा उपलब्ध नसल्यामुळे त्याच ठिकाणी सदरचा मुद्देमाल गोडाऊनला सीलबंद करून ठेवण्यात आला होता. सदर मुद्देमालाची विल्हेवाट, नाश करण्याचे न्यायालयाचे आदेश झाल्याने एमआयडीसी पोलीस स्टेशन येथील पोलीस अधिकारी अंमलदार व अन्नसुरक्षा अधिकारी, महानगरपालिकाचे अधिकारी व कर्मचारी यांनी सदर गोडाऊन उघडले असता त्या गोडाऊन मध्ये जप्त केलेल्या मुद्देमाल यापैकी काही मुद्देमाल कमी असल्याचे निदर्शनास आले.

पोलीस स्टेशनच्या अभिलेखाची तुलाना सध्या उपलब्ध असलेल्या मुद्देमालाशी केली असता विविध प्रकारचे सुगंधित तंबाखू व पानमसाला असा मिळून ४० लाख १५ हजार रुपयाचा मुद्देमाल गोडाऊनच्या एका कोप-यातील पत्रा उचकटून आत प्रवेश करून कोणीतरी अज्ञात चोरटयांनी चोरून नेल्याचे दिसून आले. त्यावरून पोलीस स्टेशन एमआयडीसी
येथे २१ जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.

वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली सदर घटनेचा छडा लावण्यासाठी विविध पथके तयार करण्यात आली. सदर पथकांनी गोपनीय माहितीच्या आधारावर राहुल भगवंत कांबळे (रा. महादेव नगर लातूर), अजित विकास घोलप (रा. घोलपवाडी पुणे), इस्माईल मधुकर कदम (रा. सिद्धात सोसायटी लातूर), समाधान परमेश्वर कांबळे (रा. खोरी गल्ली लातूर), खमरउनिसा युनुस निळकंठ (रा. एमआयडीसी लातूर), नमा युनुस निळकंठे (रा. एमआयडीसी लातूर), रंजना भगवान कांबळे (रा. महादेव नगर लातूर), महेश विकास बनसोडे (रा. पंढरपूर जिल्हा सोलापूर), किरण बाई गाताडे (रा. महादेव नगर लातूर) उमेश जाधव (रा. पंढरपूर), बाळकृष्ण रामचंद्र गणे (रा. वसवाडी लातूर), खादर शेख (रा. चाकुर) अहमदपूर येथील एक दुकानदार अशा १३ लोकांनी आपसात संगनमत करून वर नमूद जप्त मुद्देमाल यापैकी ४० लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे निष्पन्न झाले. नमूद आरोपींना गुन्ह्यात अटक करून त्यांच्याकडून सदरचा मुद्देमाल हस्तगत करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या