23.6 C
Latur
Saturday, January 28, 2023
Homeलातूर५५ सहकारी संस्थांची निवडणूक स्थगित

५५ सहकारी संस्थांची निवडणूक स्थगित

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
जिल्ह्यातील ‘अ’ आणि ‘ब’ वर्गातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरु झाली होती. परंतू, राज्यात सध्या ग्रामपंचायत निवडुकीची प्रक्रिया सुरु आहे. डिसेंंबरअखेरपर्यंत ही प्रक्रिया सुरु राहणार आहे. त्यामुळे या दोन्ही निवडणुकांमुळे गावागावात तणावाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता शासनाने ‘अ’ आणि ‘ब’ वर्गातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती दिली आहे. यात लातूर जिल्ह्यातील ५५ सहकारी संस्थांचा समावेश आहे.

राज्यात ग्रामपंचायतींसह विविध सहकारी सोसायटीच्या निवडणुकीची प्रक्रियाही सुरु झाली आहे. ‘अ’ आणि ‘ब’ वर्गातील सहकारी संस्थांच्या निवडणुका चांगल्याच गाजतात. त्यातच ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. दोन्ही निवडणुकांमुळे गावागावातील वातावरण तणावाणचे होऊ नये, याकरीता शासनाने ‘अ’ आणि ‘ब’ सहकारी संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती दिली आहे. राज्य निवडणुक आयोगाने दि. १८ नोव्हेंबर ते दि. २० डिसेंंबर या कालावधीत राज्यातील ७ हजार ७१५ ग्रामपंचायतींचा निवडणुक कार्यक्रम जाहीर केला आहे. यामध्ये निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करणे, नामनिर्देशन मागवून छाननी कराणे, नामनिर्देशन मागे घेणे, मतदानाचा दिनांक, मतमोजणी व निकाल घोषीत करण्याची तारीख जाहीर करण्यात आली आहे. या सर्व ग्रामपंचायतींची निवडणुकीचा निकाल दि. २० डिसेंबर रोजी जाहीर होणार
आहे. निवडणुकीच्या निकालाची अधिसूचना दि. २३ डिसेंबर रोजी प्रसिद्ध होणार आहे.

ग्रामपंचायतींच्या निवडणुका सुरु असतानाच राज्य सहकारी निवडणुक प्राधिकरणाने ७ जार १४७ इतक्या सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रमदेखील सुरु करण्यात आला होता. राज्य सहकारी निवडणुक प्राधिकरणामार्फत निवडणुकांचा कार्यक्रम सुरु करण्यात आलेल्या ७ हजार १४७ सहकारी संस्थांत ‘अ’ वर्गातील ३८ आणि ‘ब’ वर्गातील १ हजार १७०, ‘क’ वर्गातील ३ हजार १५१ आणि ‘ड’ वर्गातील २ हजार ७८८ सहकारी संस्था आहेत. जिल्ह्यात ‘अ’ वर्गातील सहकारी संस्थांची निवडणुक नाही. पण, ‘ब’ वर्गातील ५५ सहकारी संस्थांच्या निवडणुका मात्र पुढे ढकलल्या आहेत. यात नागरी बँका, कर्मचा-यांच्या पथसंस्था, अर्थसहाय्य औद्योगिक संस्था, खरेदीविक्री संघ आदी संस्थांच्या निवडणुकांचा समावेश आहे.

Stay Connected

1,567FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या