26.9 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeलातूर८८ कंत्राटी चालकांची सेवा बंद

८८ कंत्राटी चालकांची सेवा बंद

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
एसटी महामंडळाच्या संपकाळात प्रवाशांची सेवा बजावणा-या कंत्राटी एसटी चालकांची दि. ३ सप्टेंबर पासून सेवा बंद करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. त्यामुळे लातूर विभागाच्या पाच आगारातील ८८ कंत्राटी एसटी चालकांची सेवा बंद झाली आहे. त्यामुळे त्यांच्या कुटूंबावर उपासमारीची वेळ आली आहे. राज्य परिवहन महामंडळात कायम असलेल्या कर्मचा-यांच्या संप काळात प्रवासी वाहतूक ठप्प झाली होती. खाजगी प्रवाशी वाहतूकदारांनी प्रवाशांकडून प्रवास भाडयापेक्षा जास्त भाडे आकारणे चालू केले होते. प्रवाशाची होत असलेली गैर सोय लक्षात घेऊन, ठप्प झालेली वाहतूक सुरळीत होण्यासाठी रा प. महामंडळाने बा संस्थेकडून जानेवारी २०२२ कंत्राटी पध्दतीने चालक भर्ती केली. यात लातूर विभागातंर्गत लातूर आगारात १७, उदगीर आगारात २२, अहमदपूर आगारात २४, निलंगा आगारात २०, तर औसा आगारातील ५ कर्मचा-यांचा समावेश आहे. कंत्राटी चालकांनी दिवस-रात्र प्रवाशांना सेवा दिली.

या कंत्राटी चालकांना कर्तव्या वरुन कमी केल्याने त्यांच्या कुटूंबावर उपासमारीची वेळ आली आहे. एसटी महामंडळाच्या लातूर विभागात ४७५ बसेस पैकी सध्या ३९७ बसेस १ हजार १९ वाहक व ८७७ चालकांच्या माध्यमातून प्रवाशांच्या सेवेत धावत आहेत. यापैकी १४० बसेस गणपती उत्सवासाठी कोकणात धावत आहेत. जिल्हयातील पाच आगारातील ८८ कंत्राटी चालकांची सेवा समाप्त करण्यात आल्याने ८७७ चालकांना आता डबल डयूटी करावी लागणार आहे.

कंत्राटी कर्मचा-यांचा हातभार
संप काळात एसटी महामंडळाची प्रवाशी सेवा ठप्प होऊ नये म्हणून खाजगी संस्थेच्या माध्यमातून ८८ कंत्राटी चालकांची लातूर विभागात भर्त्ती झाली होती. संप मिटल्यानंतर सर्व कर्मचारी सेवेत दाखल झाले होते. कंत्राटी कर्मचा-यांच्यामुळे प्रवासी वाहतूक वाढण्यासाठी हातभार लागला. मात्र प्रशासनाकडून घेण्यात आलेल्या निर्णयामुळे कंत्राटी चालकांची सेवा दि. ३ सप्टेंबर पासून संमाप्त झाली आहे. त्यामुळे नियमित चालकांना डबल डयूटी करावी लागणार असल्याचे लातूरचे विभागीय वाहतूक अधिकारी अभय देशमुख यांनी दिली.

सेवेत परत घेण्यासाठी ८८ चालकांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
रा. प. महामंडळ कर्मचा-यांच्या संप काळात प्रवासी वाहतूक ठप्प झाली होती. प्रवाशाची होत असलेली गैर सोय लक्षात घेऊन, ठप्प झालेली वाहतूक सुरळीत होण्यासाठी रा प. महामंडळाने बा संस्थेकडून कंत्राटी पध्दतीने चालक भर्ती केली. पडत्या काळात कंत्राटी चालकांनी एसटी महामंडळाला आधार दिला. मात्र आचनकपणे चालकांना कर्तव्या वरुन कमी करून उपासमारीची वेळ आनलेली आहे. मुख्यमंत्र्यांनी सर्व कंत्राटी चालकांना रा.प. महामंडळाकडुन सेवेत घेण्याचा निर्णय घ्यावा, आशी मागणी निवेदनाव्द्वारे मुख्यमंत्र्यांना कंत्राटी चालकांनी केली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या