19.8 C
Latur
Monday, December 5, 2022
Homeलातूरऐ अल्लाह धार्मिक द्वेष पसरविणा-यांना नेक हिदायत दे

ऐ अल्लाह धार्मिक द्वेष पसरविणा-यांना नेक हिदायत दे

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
आपल्या देशात कधी नव्हे एवढ्या मोठ्या प्रमाणात धार्मिक द्वेष पसरवला जात आहे. यातून देशाचे भले तर होणारच नाही उलट प्रगतीशील देश अधोगतीकडे जात आहे. देशातील एकोपा, बंधुभाव, प्रेम, जिव्हाळा, वात्सल्य, एकमेकांबद्दलची असलेली धर्मापलिकडील कणव संपत चालली आहे. हे कोण करतेय, का केले जाते?, त्यांचा हेतू काय? या सर्व गोष्टी अल्लाहूतआला ब-यापैकी जाणुन आहेत. हिंदू-मुस्लिम यांच्यातील स्नेह संपत चालला आहे. माणुसकी धुसर होत चालली आहे. कोणत्याच धर्माने कधीच द्वेष शिकवलेला नाही. असे असतानाही मानवतेचा -हास करायला निघालेले काही लोक जाणिवपुर्वक धार्मिक द्वेषाचे विष पेरत आहे. ऐ अल्लाह अशा लोकांना नेक हिदायत दे आणि देशातील भाईचारा कायम ठेव, अशी प्रार्थना हजारोंच्या उपस्थितीत येथील ईदहावर करण्यात आल्.ाी.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गेली दोन वर्र्षे ईद-उल- फित्र सार्वजनिक स्वरुपात साजरी झालेली नव्हती. मात्र यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरला आणि त्या अनुषंगाने जारी करण्यात आलेल्या कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनाही शिथील करण्यात आल्या. त्यामुळे दि. ३ मे रोजी लातूर शहर व परिसरात ईद-उल- फित्र सार्वजनिक स्वरुपात उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी ९.३० वाजता ईदगाहवर सामूहिक नमाज अदा करण्यात आला. वेगवेगळ्या वेळांमध्ये शहरातील विविध मस्जिदींमधूनही ईद-उल- फित्रची नमाज झाली. नमाजनंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांना गळाभेटी देऊन र्ईदच्या शुभेच्छा दिल्या.

यंदाचा रमजानचा महिना दि. ३ एप्रिल रोजी सुरू झाला होता. मुस्लिम बांधवांनी संपूर्ण महिनाभर रोजा (उपवास) केले. काल दि. २ मे रोजी ईदचा चाँद दिसला आणि दि. ३ मे रोजी ईद-उल- फित्र उत्साहात साजरी झाली. सकाळी ९ वाजता ईदहावर जमिअत-ए-उलेमाचे जिल्हा सचिव मुफती ओवेस कास्मी यांचे बयान (प्रवचन) झाले. त्यांनी ईद-उल- फित्रच्या अनुषंगाने बयान केले. तसेच आपल्या प्रगतिशील देशातील युवकांनी उद्योग, व्यवसायात आपले कौशल्य पणाला लावून देशाच्या आर्थिक विकासात योगदान द्यावे, तरुणांमध्ये वाढत चाललेली व्यसनाधिनता चिंतेचा विषय असून तरुणांनी व्यसनापासून अलिप्त राहावे. कोरोना आणि त्यासारख्या असंख्य रोगांत माणुस गुदमरुन चालला आहे. त्यामुळे सर्वांनीच वैयक्तिक काळजी घेण्यासोबतच सामाजिक आरोग्य बिघडणार नाही याचीही काळजी घेणे आवश्यक आहे. देशात गरीबांची संख्या लक्षणिय आहे. ज्यांना अल्लाहनी भरपूर दिलेले आहे, अशांनी दानत दाखवत गरीबांची मदत करावी, असे आवाहनही त्यांनी आपल्या बयानमधून केले.

जमिअत-ए-उलेमाचे जिल्हा सचिव मुफती ओवेस यांच्या बयानंतर सकाळी ९.३० वाजता जमिअत-ए-उलेमाचे शहराध्यक्ष मुफती सोहेल यांच्या मागे ईद-उल- फित्रची नमाज झाली. नमाजनंतर मुफती सोहेल यांनी अल्लाहकडे दुवा मागितला. हजारोंच्या संख्येने उपस्थितीत मुस्लिम बांधवांनी या दुआमध्ये सहभागी होत अल्लाहकडे मागणे मांडले. आज आपल्या देशात धार्मिक द्वेष पसरवला जात आहे. नव्हे तो जाणिवपूर्वक पेरला जात आहे. यामुळे हिंदू-मुस्लिम बांधवांची मने दुखत आहेत. धार्मिक द्वेष पसरविणा-यांचा विशिष्ट स्वार्थ असतो. हा स्वार्थ सर्वांनीच ओळखून पे्रम, बंधूभाव काम ठेवावा, असे आवाहन करुन ऐ अल्लाह सर्वांनाच नेह मार्गवरुन चालण्याची तौफिक दे, अशी प्रार्थना केली.

ईद-उल- फित्रच्या नमाजसाठी शहरातील चारही दिशांनी मुस्लिम बांधव मंगळवारी सकाळी ईदगाहकडे निघाले होते. नवेकोरे कपडे, अत्तराचा सुगंध, सुरमा लावून मुस्लिम बांधव ईदगाहवर आले होते. नमाजची वेळ झाली त्यावेळेपर्यंत ईदगाहवरील जागा अपुरी पडली. त्यामुळे नंतर आलेल्या मुस्लिम बांधवांना ईदगाहच्या बाहेरच्या बाजूला नजाम अदा करावी लागली. ईद-उल- फित्रच्या नमाजच्या वेळी पोलिसांनी अत्यंत चांगला पोलिस बंदोबस्त ठेवला होता.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या