24.2 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeलातूरऑक्सिजननिर्मितीत लातूर जिल्हा स्वयंपूर्ण

ऑक्सिजननिर्मितीत लातूर जिल्हा स्वयंपूर्ण

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
‘प्राणवायु’चे महत्व काय असते हे कोरोनाने सर्वांनाच दाखवून दिलेले आहे. कोरोनाची लातूर जिल्ह्यातील दुसरी लाट प्राणवायुच्या अनुषंगने सर्वांनाच आठवणीत राहिली. या लाटेत ऑक्सिजन मिळाले नाही. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची मोठी गैरसोय झाली. आरोग्य यंत्रणेने उपलब्ध केलेले ऑक्सिजन कमी पडले होते. कारण रुग्णसंख्या वाढली होती. ही परिस्थिती पुन्हा येऊ नये याकरीता ऑक्सिजन निर्मितीला प्राधान्य देण्यात आले. आज लातूर जिल्हा ऑक्सिन निर्मितीत स्वयंपूर्ण झाला आहे. सद्य:स्थितीत हवेतून ८.०४ मे. टन ऑक्सिजन तयार होत आहे.

लातूर शहरातील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हवेतून ३.८४ मे. टन ऑक्सिजन निर्मितीचा प्रकल्प तयार झाला आहे. शहरातील लेबर कॉलनीतील माता रमाई स्त्री रुग्णालयात ०.३७ मे. टनाचा प्रकल्पही सुरु झाला आहे. उदगीर येथील उपजिल्हा रुग्णालयात १.३० लाख रुपये खर्च करुन १.१२ मे. टन ऑक्सिजन निर्मितीचा प्रकल्प उभारला गेला आहे. निलंगा उपजिल्हा रुग्णालयातही १.१२ मे. टन क्षमतेचा हवेतून ऑक्सिजन निर्मितीचा प्रकल्प कार्यान्वित झाला आहे. ग्रामीण भागातही ग्रामीण रुग्णालय मुरुड येथे ०.१९ मे. टन , औसा ग्रामीण रुग्णालयात ०.५६ मे. टन, अहमदपूर ग्रामीण रुग्णालयात ०.९४ मे. टन ऑक्सिजन निर्मितीचा प्रकल्प सुरु झाला आहे.

जिल्ह्यात एकुण ०.४५ मे. टन ऑक्सिजन निर्मितीचे पाच प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत. देवणी, चाकुर, रेणापूर, जळकोट आणि किल्लारी ग्रामीण रुग्णालयात प्रत्येकी ०.९ मे. टन ऑक्सिजन निर्मितीचे प्रकल्प प्रस्तावीत आहेत. यंत्र सामुृग्री बसविण्याचे काम सुरु आहे. लवकरच या आरोग्य संस्थामध्येही हवेतून ऑक्सिजन निर्मितीचे हे प्रकल्प कार्यान्वित होतील, असे आरोग्य यंत्रणेच्या वतीने सांगण्यात आले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या