28.8 C
Latur
Saturday, February 4, 2023
Homeलातूरजळकोट बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया सुरू

जळकोट बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया सुरू

एकमत ऑनलाईन

जळकोट : जळकोट कृषि उत्पन्न बाजार समितीवर सध्या प्रशासक आहग़त महिन्यामध्ये अशासकीय प्रशासक मंडळ बरखास्त झाले होते. त्यानंतर प्रशासक म्हणून अमोल वाघमारे यांची नियुक्ती करण्यात आली होती. सध्या
सहकार विभागाच्या वतीने मतदार यादीचे काम सुरू असून कृषि उत्पन्न बाजार समितीसाठी जे मतदार आहेत. त्यांची प्रारूप मतदार यादी दि१४ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

या प्रारूप प्रसिद्धी यादीवर १४ ते २३ नोव्हेंबर दरम्यान हरकती घेता येणार आहेत तर या हरकतीवर सुनावणी २८ नोव्हेंबर रोजी घेतली जाणार आहे तर यावर निर्णय दोन डिसेंबर रोजी देण्यात येणार आहे. जळकोट कृषि उत्पन्न बाजार समितीची अंतिम मतदार यादी दि. ७ डिसेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. जळकोट येथील कृषि उत्पन्न बाजार समितीसाठी १०७३ मतदार आहेत. यामध्ये विविध कार्यकारी सेवा सोसायटी गटातून ४४५, ग्रामपंचायतीमधून ३५४, व्यापारी गटातून २०४, तर हमाल ७० असे एकूण १०७३ मतदार कृषि उत्पन्न बाजार समितीसाठी आहेत. एवढ्या मतदारांची प्रारूप यादी दि १४ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे .

जळकोट कृषि उत्पन्न बाजार समितीच्या मतदार यादीची प्रक्रिया सुरू झाल्यामुळे, आता जळकोट कृषि उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे बिगुल वाजण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे . डिसेंबरच्या अखेर किंवा जानेवारी महिन्यामध्ये जळकोट कृषि बाजार समितीसाठी निवडणूक लागण्याची शक्यता आहे. जळकोट कृषि उत्पन्न बाजार समितीवर यापूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे . ही बाजार समिती स्थापन झाल्यापासून या बाजार समितीवर आत्तापर्यंत विरोधकांना बाजार समिती ताब्यात घेता आली नाही . जळकोट कृषि उत्पन्न बाजार समिती स्थापन झाल्यानंतर पहिले सभापती म्हणून धोंडिराम पाटील यांनी काम पाहिले, यानंतर मन्मथ किडे यांनी सभापती म्हणून काम पाहिले तर अशासकीय प्रशासकपदी अर्जुन पाटील आगलावे यांची नियुक्ती करण्यात आली होती . यापूर्वी भाजपा सरकारने कृषि उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये शेतक-याना मतदानाचा हक्क दिला जाईल असे सांगितले होते परंतु येणारी बाजार समितीसाठी निवडणूक होणार आहे त्या निवडणुकीमध्ये पूर्वी ठरल्याप्रमाणेच म्हणजेच सोसायटी सभास, ग्रामपंचायत सदस्य, व्यापारी व हमाल यांनाच मतदान करता येणार आहे.

Stay Connected

1,567FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या