लातूर : प्रतिनिधी
मांजरा साखर परिवारातील सर्वच साखर कारखाने क्षमतेपेक्षा अधिक वेगाने उसाचे गाळप सुरू ठेवून उस उत्पादक शेतक-यांच्या उसाचे गाळप करीत आहेत. मात्र अजून काही लोक राहीलेले आहेत का ? राहिले असतील तर त्यांचेही लवकरच उसाचे गाळप होईल असा विश्वास ट्वेंटी वन शुगरचे उपाध्यक्ष विजय देशमुख यांनी उस उत्पादक शेतक-यांना दिला आहे.
लातूर तालुक्यातील कासारखेडा येथे थेट गावात कट्टयावर बसून उस उत्पादक शेतक-यांकडून गाळपाची माहिती घेतली. शेतक-यांना आर्श्वासित केले आहे. त्यामूळे गाळप विना कुणाचाही उस शिल्लक राहणार नाही असा प्रयत्न मांजरा साखर परिवाराकडून होत आहे अशी माहिती ट्वेंटी शुगरचे उपाध्यक्ष विजय देशमुख यांनी बोलताना दिली आहे.
यावेळी कासार खेडा येथील उस उत्पादक तथा पंचायत समिती सदस्य रघुनाथ शिंदे, शेतकी अधिकारी मिलिंद पाटील, नीलकंठ शिंदे, ज्ञानोबा थोरात, बाबुराव जाधव, अनिल शिंदे, महेताब सय्यद, रमेश शिंदे, गोविंदराव शिंदे, शाहूराज माने,अरुण शिंदे, पाशा तांबोळी, गणेश शिंदे, गजानन शिंदे, धनंजय शिंदे, सूरज शेख, नवनाथ शिंदे, रामप्रभू गाडेकर, आदी उस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.