25.1 C
Latur
Sunday, September 25, 2022
Homeलातूर‘दयानंद वाणिज्य’च्या ३६ विद्यार्थ्यांची मुलाखतीतून निवड

‘दयानंद वाणिज्य’च्या ३६ विद्यार्थ्यांची मुलाखतीतून निवड

एकमत ऑनलाईन

लातूर : येथील दयानंद वाणिज्य महाविद्यालयातील प्लेसमेंट सेलमार्फत कॅम्पस मुलाखतींचे आयोजन करण्यात आले होते. मुलाखतीच्या तीन वेगवेगळ्या फे -यामधून ३६ विद्यार्थ्यांची टी. सी. एस. व आय. सी.आय. सी. आय. बँकेत निवड झाली आहे. प्राचार्य डॉ. श्रीराम सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली प्लेसमेंट सेल ने यासाठी विशेष मेहनत घेतली. मुलाखतीमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी, सचिव रमेश बियाणी, नियामक मंडळाचे सदस्य नरेश पंड्या, शशिकांत कोटलवार, प्राचार्य डॉ. श्रीराम सोळंके, उपप्राचार्य डॉ. राजाराम पवार यांनी अभिनंदन करून सत्कार केला. यावेळी अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष प्रमुख डॉ. बालाजी कांबळे, बी. सी. ए. विभागप्रमुख प्रा.शशिकांत स्वामी, बी. बी. ए. विभागप्रमुख डॉ. वैशाली सातपुते, बी. व्होक विभागप्रमुख डॉ. विशाल वर्मा, कार्यालयीन अधीक्षक ज्ञानेंद्र कातपुरे आदींची उपस्थिती होती.
या कॅम्पस मुलाखती यशस्वी करण्यासाठी प्लेसमेंट सेलचे प्रमुख प्रा. दगडू शेख, डॉ. स्मिता भक्कड, प्रा. लहू शेंडगे, प्रा. कल्याणी पाटील, डॉ. क्यू. एन. शेख, प्रा. श्रावण बनसोडे, प्रा. सुधीर माने आदींनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. श्रावण बनसोडे यांनी केले व आभार प्रा. कल्याणी पाटील यांनी मानले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या