देवणी : देवणी शहरातील निलंगा – उदगीर राज्य मार्गावरील बोरोळ चौक परिसरात भर रस्त्यावर चालत्या दुचाकीने अचानकपणे पेट घेतला. घटनास्थळी नागरिकांनी धाव घेऊन आग विझविण्याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत दुचाकी जळून खाक झाली. ही घटना रविवार दि.१७ एप्रिल रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली.
भररस्त्यावर चालत्या दुचाकीला अचानकपणे लागलेल्या आगीमुळे नागरिकात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. तर सदरील घटना दुरवरुनच बघण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती. तर दुचाकीची आग विझविण्यासाठी दोन नागरिकांनी जीव धोक्यात घालून शर्थीचे प्रयत्न केल्याने आग आटोक्यात आली. दुचाकीला आग उन्हामुळे की आणखीन कोणत्या कारणाने आग लागली याचे कारण अद्यापही अस्पष्टच आहे. मात्र सदरील आग उन्हामुळेच लागली असवी असा नागरिकांचा प्राथमिक अंदाज आहे