36.4 C
Latur
Wednesday, May 25, 2022
Homeलातूरपाणीटंचाईचे सव्वातीन कोटी थकले

पाणीटंचाईचे सव्वातीन कोटी थकले

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
जिल्ह्यातील नागरिकांना पिण्यासाठी पाणी मिळावे, म्हणून लातूर जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने टंचाई कृती आराखडा तयार केला होता. टंचाईच्या तात्पुरत्या उपाययोजनांवर ३ कोटी ५ लाख ९० हजार रुपये खर्च झाले. सदर उपाय योजनांचे पैसे सहा महिने झाले तरी ते मिळाले नसल्याने शेतक-यांच्या आडचणी वाढल्या आहेत. सदर थकीत पैशासाठी शेतकरी पंचायत समिती व जिल्हा परिषदेकडे हेलपाटे मारताना दिसून येत आहेत.

लातूर जिल्ह्यात गेल्यावर्षी जुलै महिण्याच्या पहिल्या आठवडया पर्यंत पाणी टंचाईच्या झळा ग्रामीण भागात तीव्र स्वरूपात जाणवल्या. जिल्ह्यात २०२० मध्ये सरासरीच्या जवळपास पाऊस झाला होता. त्यामुळे गेल्यावर्षी एप्रिल, मे, जून व जुलै महिण्याच्या पहिल्या आठवडया पर्यंत ग्रामीण भागात अधिग्रहणाद्वारे पाणी पुरवठा करावा लागला. जिल्हयात अशी परिस्थिती असली तरी टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याची गरज भासली नाही. जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावल्याने पाणी टचांईची तीव्रता जुलै महिन्याच्या पहिल्या आठवडया नंतर निवळली. तसेच इतर उपाय योजनाही गेल्या वर्षात राबविण्यात आल्या.

जिल्हयात ग्रामीण भागात ऑक्टोबर २०२० ते ३० जून २०२१ या कालावधीत पेयजल टंचाई निवारणार्थ विविध उपाया योजना राबवण्यात आल्या. यात १२ नळ योजनांच्या विशेष दुरुस्तीवर ७५ लाख २ हजार रूपये खर्च झाले आहेत. २० तात्पुरत्या पूरक नळ पाणी पुरवठा योजना घेण्यावर १ कोटी ८९ लाख १५ हजार रुपये खर्च झाले आहेत. तसेच खाजगी विहीर, विंधन विहीर अधिग्रहण करण्याच्या ११५ कामावर ४१ लाख ७३ हजार रुपये खर्च झाले. गेल्या वर्षभरात पाणी टंचाई व उपाय योजनांच्या १४७ कामावर ३ कोटी ५ लाख ९० हजार रुपये खर्च झाले आहेत. सदर झालेल्या खर्चाची लातूर जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने शासनाकडे निधीची मागणी केली आहे.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या