22.3 C
Latur
Wednesday, August 17, 2022
Homeलातूरबचत गटामुळे गावातील सावकारी संपूष्ठात

बचत गटामुळे गावातील सावकारी संपूष्ठात

एकमत ऑनलाईन

औसा : महिला बचंत गटामुळे ग्रामीण भाागतील सावकारकी संपूष्ठात आली असल्याचे मत विषय तज्ज्ञ प्रा. अंजली गुंजाळ यानी व्यक्त केले. टाका येथे लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त येथील युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अजित शिंदे यांनी बुधवारी महीला बचत गटाच्या माध्यमातून करण्यात येणा-या लघुउद्योगाचे मार्गदर्शन करण्यासाठी महिला मेळाव्याचे आयोजन केले होते.

बचत गटांच्या माध्यमातून व्यवसाय करण्याची संधी मिळावी जेणेकरून ग्रामीण महिला सक्षमीकरणास चालना मिळेल या उद्देशाने महीला मेळाव्याचे आयोजन केल्याचे अजित शिंदे यांनी सांगितले. मेळाव्यासाठी उद्घाटक म्हणून उमेद अभियानाच्या जिल्हा प्रशिक्षण समन्वयक अनिता माने तर मार्गदर्शक म्हणून लातूर येथील कृषि विज्ञान केंद्रातील विषयतज्ज्ञ प्रा.अंजली गुंजाळ या उपस्थित होत्या. तसेच लातूर ग्रामीण युवक काँग्रेसचे अध्यक्ष रघुनाथ शिंंदे, औसा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नामदेव माने आणि विलासराव युवा मंचचे तालुकाध्यक्ष रवी पाटील, गोरख सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्रा.गुंजाळ महिलांना मार्गदर्शन करताना म्हणाल्या, महिला बचत गटांमुळे गावातील सावकारकी संपत चालली आहे.

बचत गटांत सहभागी होताना महिलांना विरोध करणारे पुरुष मंडळी आता मात्र अडीअडचणीला महिलांकडे आर्थिक मदतीची मागणी करताना दिसून येत आहेत. त्यामुळें महिलांनी बचत गटांच्या माध्यमातून गावोगावी अधिकाधिक उद्योग निर्मितिी व त्यातून रोजगार निर्मिती करण्यावर भर देणे गरजेचे असल्याचेही गुंजाळ यांनी सांगितले. यावेळी माने यांनीही ग्रामीण भागातील महिलांसाठी उपलब्ध असलेल्या शेकडो व्यवसायाच्या संधीबाबत महिलांना मार्गदर्शन केले. यावेळी कोरोना संकटात धैर्याने काम करणारे आरोग्य कर्मचारी आणि आशा कार्यकर्तीचा ही मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला प्रास्ताविक अजित शिंदे यांनी केले तर विजयश्री भांगे यांनी आभार मानले

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या