24 C
Latur
Sunday, September 25, 2022
Homeलातूरबिबराळ रस्त्यावरील नाला अपघातास निमंत्रण

बिबराळ रस्त्यावरील नाला अपघातास निमंत्रण

एकमत ऑनलाईन

शिरूर अनंतपाळ : शिरूर अनंतपाळ तालुक्यातील बिबराळ रस्त्यावरील पुल व्हावा यासाठी ग्रामस्थांतून मागणी केली जात आहे. नाल्यात खड्डे पडून पाणी साचल्याने रहदारीस अडचण निर्माण झाली असून या नाल्यावरील पुलाची सोय करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांतून केली जात आहे.

गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या या पुलासाठी प्रशासनाकडे मागणी करण्यात येत आहे. मात्र प्रशासनाकडून अद्याप ही यांकडे लक्ष देण्यात आले नाही. परिणामी या नाल्यावरून प्रवास करण्यासाठी कसरत करावी लागत असून प्रशासनाने यांकडे लक्ष द्यावे, व या भागातील लोकांची होणारी गैरसोय टाळावी अशी मागणी केली आहे.

दरम्यान उजेड ते बिबराळ रस्त्यावर गावांजवळून वाहणा-या नाल्यावर पुल व्हावे, अशी अनेक वर्षापासूनची मागणी असून अद्याप पर्यंत लोकप्रतिनिधी व प्रशासनाने यांकडे लक्ष दिले नसल्याने या खड्डे पडलेल्या जलमय रस्त्यावरून वाहन चालविणे जिकिरीचे झाले आहे. पाण्यामुळे खोलीचा अंदाज येत नसल्याने बिबराळ रोडवरील हा नाला अत्यंत धोकादायक बनला असून सतत अपघात घडत आहेत.

अनेक वर्षापासून दूरूस्तीच्या प्रतिक्षेत असलेला रस्ता डांबरी रस्ता झाला. पण बिबराळ नाल्यावर पुल नसल्याने नाल्याच्या पाण्यात दररोज अपघात होत असून वाहनधारकांना इजा पोहचत आहे. त्यामूळे या नाल्यावर पुल बांधून अपघात टाळावेत अशी मागणी सरपंच प्रल्हाद जन्मले व ग्रामस्थांनी केली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या