22.3 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeलातूरलातूर मनपाने महिलांसाठी मोफत बस सेवा सुरु केल्याबद्दल केला गौरव

लातूर मनपाने महिलांसाठी मोफत बस सेवा सुरु केल्याबद्दल केला गौरव

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
लातूर महानगरपालिकेने महिलांसाठी मोफत बस सेवा सुरु केल्याबद्दल लातूर महापालिकेचा गौरव करून कोरोनाच्या काळात आरोग्य विभाग, महिला व बालविकास विभागाने केलेले उल्लेखनिय कार्य केल्याबाबत राज्य महिला आयोगाच्या सदस्य अ‍ॅड. संगिता चव्हाण यांनी गौरोद्गार काढले.

जिल्ह्यातील महिला विषयक प्रकरणांची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. त्यावेळी त्या बोलत होत्या. या बैठकीस जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, मनपा आयुक्त अमन मित्तल, निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. लक्ष्मण देशमुख, उप मुख्य कार्यकारी अधिकारी देवदत्त गिरी, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी वर्षा पवार, जिल्ह्यातील सर्व बाल विकास प्रकल्प अधिकारी, पोलीस विभागाचे अधिकारी, संबंधित विभागाचे विभाग प्रमुखांची उपस्थिती होती.

राज्य महिला आयोगाच्या सदस्या अ‍ॅड. संगिता चव्हाण बैठकीत मार्गदर्शन करताना म्हणाल्या की, सेक्स वर्कर्स यांच्यासाठीचा निधी मुख्यमंत्री सहायता निधीमधून वितरित झाल्याबाबत खात्री करून घ्यावी. तसेच सेक्स वर्कर्सना प्रशिक्षण देऊन त्यांना प्रगल्भ करून त्यांना त्यांच्या पायावर उभा करण्याचा प्रयत्न करावा. तृतीय पंथीयांसाठी एक तरी हॉस्पिटल असलायला हवे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. तसेच त्यांना व्यवसायाचे प्रशिक्षण देणे व उद्योग उभारण्यासंबधीचे मार्गदर्शन करण्यासाठी सकारात्मक काम करावे. तसेच प्रत्येक कार्याल्याात विशाखा समिती नेमणे, शाळा, महाविद्यालयात सीसीटिव्ही बसवणे, कोविडच्या काळात पती गमावलेल्या महिलांना बी, बियाणे अथवा इतर अर्थिक मदत करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून प्रयत्न करावेत. ऊसतोड कामगार यांच्यासाठी साखर कारखाने आणि सहकार आयुक्त यांच्या प्रयत्नातून विमा काढला जावा असे आवाहन केले. अ‍ॅड. संगिता चव्हाण या निर्भया पथक, महिला सेल, कंट्रोल रुम जिल्ह्यात विविध विभागातर्फे महिलांविषयक राबविलेल्या कल्याणकारी योजनांची त्या त्या ठिकाणी जाऊन माहिती घेणार आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या