25.1 C
Latur
Sunday, September 25, 2022
Homeलातूरविलासराव देशमुख अभय योजनेत लातूर परिमंडलातून २.९३ कोटी रुपयांचा भरणा

विलासराव देशमुख अभय योजनेत लातूर परिमंडलातून २.९३ कोटी रुपयांचा भरणा

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
कृषी वर्गवारी वगळता इतर सर्व वर्गवारितील लघु आणि उच्च्दाब श्रेणीतील कायम स्वरुपी वीज पुरवठा खंडीत झालेल्या वीज ग्राहकांना विजेच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी महावितरणतर्फे ‘विलासराव देशमुख अभय योजना’ सुरु करण्यात आलेली आहे. मार्च २०२२ पासून सुरु असलेल्या या योजनेत लातूर परिमंडलातील २०१ कायम स्वरुपी वीज पुरवठा खंडीत झालेल्या ग्राहकांनी २.९३ कोटी रुपयांचा भरणा करून सहभाग नोंदविला आहे. इतर खंडीत ग्राहकांनी योजनेचा लाभ, घ्यावा असे आवाहन मुख्य अभियंता सुंदर लटपटे यांनी केले आहे.

लातूर परिमंडलात लातूर जिल्ह्यातून ९२५०१ ग्राहकांकडे ७०.७९ कोटी. बीड जिल्ह्यातून एक लाख ४१,८३७ ग्राहकांकडे २२९.९१ कोटी तर उस्मानाबाद जिल्ह्यातून ७८,३६७ ग्राहकांकडे महावितरणची वीज बिलाची ९२.३१ कोटी रुपयांची मूळ थकबाकी होती. थकबाकीमुळे परिमंडलातून ३ लाख १२ हजार ७०५ ग्राहकांचा वीज पुरवठा कायम स्वरुपी खंडीत होता. त्यांच्याकडे एकूण मूळ थकबाकी ३९३.०३ कोटी रुपयांची आहे. पैकी लातूर जिल्ह्यातून ६७ ग्राहकांनी १.२८ कोटी बीड – ४३ ग्राहकांनी १.४३ कोटी तर उस्मानाबाद जिल्ह्यातून ९१ ग्राहकानी ४९.४४ लाख रुपयांचा भरणा केला आहे. परिमंडलात आजपर्यंत २०१ ग्राहकांनी २.९३ कोटी रुपयांचा भरणा केला आहे.

योजनेत सहभागी होण्यासाठी व्याज व विलंब आकारात शंभर टक्के माफी देण्यात आली आहे. लघुदाब ग्राहकांनी मूळ थकबाकी एकरकमी भरल्यास दहा टक्के तर उच्च्दाब ग्राहकांनी एकरकमी वीज बिलाचा भरणा केल्यास पाच टक्के अधिकची सवलत देण्यात आली आहे. योजनेत सहभागी होवून हप्त्यानेही थकबाकी भरण्याची सोय आहे. ‘विलासराव देशमुख अभय योजना ३१ ऑगस्टपर्यंत सुरू आहे. कायम स्वरुपी वीज पुरवठा खंडित झालेल्या ग्राहकांनी योजनेच्या तपशीलवार माहितीसाठी नजीकच्या महावितरण कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या