25.1 C
Latur
Sunday, September 25, 2022
Homeलातूरव्यापारी संघटनांकडून केंद्र सरकारचा निषेध

व्यापारी संघटनांकडून केंद्र सरकारचा निषेध

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
केंद्र सरकारच्या जीवनावश्यक अन्न धान्य यावर ५ टक्के जीएसटी आकारणी कराच्या विरोधात लातूर किराणा असोसिएशन, डाळ मिल असोसिएशन व लातूर चेम्बर ऑफ कॉमर्स या सर्व व्यापारी संघटनाच्या वतीने दि. १६ जुलै रोजी सर्व व्यवहार बंद ठेऊन केंद्र सरकारच्या या निर्णयाचा विरोध करीत निषेध करण्यात आला.

लातूर व्यापारी संघटनेच्या या आंदोलनास व व्यवहार बंद आंदोलनास लातूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे लातूर शहर जिल्हाध्यक्ष मकरंद सावे व जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांतभैय्या पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी उद्योग व व्यापार विभागाचे लातूर शहर जिल्हाध्यक्ष ताजभाई शेख, जिल्हा कार्याध्यक्ष प्रविणसिंह थोरात, जमिल नाना, विशाल अग्रवाल, अब्दूला शेख, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस लातूर शहर जिल्हाध्यक्ष विशाल विहीरे, राष्ट्रवादी अर्बन सेल व राष्ट्रवादी माहिती तंत्रज्ञान विभागाचे डी. उमाकांत यांनी लातूर शहर किराणा व होलसेल व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष बस्वेश्वर वळसंगे यांना पाठिंब्याचे पत्र सुपुर्त करुन पाठिंबा दिला.

यावेळी लातूर किराणा असोसिएशन, डाळ मिल असोसिएशन व लातूर चेम्बर ऑफ कॉमर्सचे विनोद छाजेड, बस्वराज मंगरुळे, अशोक अग्रवाल, विशाल अग्रवाल, सुनिल कोटलवार, योगेश पारशेवार, निजाम हुच्चे, किशोर कोटलवार, बाबाहरी कोटलवार, रफिक नाना, राहुल अग्रवाल इत्यादींसह अनेक व्यापारी बांधव उपस्थित होते.

लातूर शहर जिल्हा काँग्रेसचा पाठींबा
केंद्र सरकारच्या अन्यायकारक कर आकारणी विरुद्ध लातूर येथील विविध व्यापारी संघटनांनी पुकारलेल्या व्यापार बंद आंदोलनास लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने पाठींबा दिला. केंद्र सरकारच्या जीवनावश्यक अन्न धान्य यावर ५ टक्के जीएसटी आकारनी कराच्या विरोधात लातूर किराणा असोसिएशन, डाळ मिल असोसिएशन व लातूर चेम्बर ऑफ कॉमर्स या सर्व व्यापारी संघटना शनिवारी त्यांचे व्यवहार बंद ठेऊन केंद्र सरकारच्या या निर्णयाचा विरोध केला. लातूर व्यापारी संघटनेच्या या आंदोलनास व व्यवहार बंद आंदोलनास लातूर शहर जिल्हा काँग्रेस जाहीर पाठिंबा दिला आहे.

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वतीने यापूर्वीच अन्नधान्य व खाद्यपदार्थ वरील या अनावश्यक व महागाई वाढीस कारणीभूत टॅक्स धोरणा विरोधात वेळोवेळी पक्षाने भूमिका जाहीर केलेली आहे. काँग्रेस पक्षाची भूमिका ही सर्व सामान्यांच्या हिताची राहिलेली आहे. या नव्या कर प्रणालीमुळे सर्वसामान्य जनतेस महागाईला तोंड द्यावे लागणार आहे, जनता आधीच केंद्राच्या चुकीच्या धोरणमुळे महागाईने त्रस्त आहे. त्यात पुन्हा महागाई वाढीस ही नवी जर प्रणाली कारणीभूत ठरणार आहे. लातूर शहर जिल्हा काँग्रेस लातूर व्यापारी संघटना यांच्या लातूर बंदच्या भूमिकेला जाहीर पाठिंबा देत आहे आणि महागाई वाढवणा-या या निर्णयाचा तीव्र निषेध करीत असल्याचे लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अ‍ॅड. किरण जाधव यांनी सांगीतले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या