36.4 C
Latur
Wednesday, May 25, 2022
Homeलातूरसंगायो समिती लातूर ग्रामीणचा लाभार्थ्यांना घरपोच सेवा देण्याचा पॅटर्न अनुकरणीय

संगायो समिती लातूर ग्रामीणचा लाभार्थ्यांना घरपोच सेवा देण्याचा पॅटर्न अनुकरणीय

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
लातूर तालुक्यातील मौजे मुशिराबाद येथे संविधान दिनाचे औचित्य साधून ३८ वी संगायो जनजागृती व सुसंवाद बैठक घेण्यात आली.कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून करण्यात आली. संगायो समिती लातूर ग्रामीणचा लाभार्थ्यांना घरपोच सेवा देणाचा पॅटर्न अनुकरणीय आहे, असे मत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस तथा लातूर शहर काँग्रेसचे प्रभारी डॉ. जितेंद्र देहाडे यांनी व्यक्त केले.

सहकार महर्षी माजी मंत्री दिलीपराव देशमुख, महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख व लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख यांच्या मार्गदर्शनानुसार संगायो , इंगायो योजनेचा लाभ लाभार्थ्यांना त्यांच्या गावात जाऊन देण्याकरिता या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुशिराबाद सोसायटीचे चेअरमन गोविंद मलवाडे पाटील होते तर प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे महासचिव व लातूरचे शहर काँग्रेसचे प्रभारी डॉ. जितेंद्र देहाडे, संगायोचे लातूर ग्रामीणचे चेअरमन प्रविण पाटील, लातूर कृषि ऊत्पन्न बाजार समीतीचे उपसभापती मनोज पाटील, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष सुभाष घोडके, महाराष्ट्र प्रदेश ओबीसी काँग्रेसचे सहसचिव हरिभाऊ गोणे, संगायोचे सदस्य हरीश बोळंगे, प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव प्रविण बिरादार, ज्ञानोबा गवळे, सचिन दाताळ, अच्युत माने उपस्थित होते.

यावेळी डॉ. जितेंद्र देहाडे यांनी आपल्या भाषणातून विकासरत्न विलासराव देशमुख यांच्या आठवणीना उजाळा दिला. लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख यांचे कार्य जनतेपुढे मांडून आमदार धिरज देशमुख यांच्या कार्याचे कौतुक केले. पुढे बोलताना त्यांनी संगायो समिती लातूर ग्रामीणच्या वतीने आदर्शवत काम सुरु असून घरपोच अर्ज वितरण, जनजागृती व सुसंवाद बैठक, समाधान शिबीर व घरपोच मंजुरी पत्र वितरण या चतुसुत्रीच्या माध्यमातून काम करत असुन लाभार्थ्यांना घरपोच सेवा उपलब्ध करून देण्याचा हा उपक्रम राज्यभर पथदर्शी ठरेल असे सांगून संगायो समिती लातूर ग्रामीणच्या या उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना प्रविण पाटील यांनी निराधारांच्या विविध योजनेची सविस्तर माहीत देऊन उपस्थितांशी विविध प्रश्नांवर चर्चा करून त्यांचे समाधान केले व घरपोच अर्ज वितरणापासुन ते घरपोच मंजूर पत्र वितरण करण्यासाठी समिती कटिबद्ध असल्याचे सांगून मुशिराबाद येथील पात्र लाभार्थ्यांना मंजूर पत्रांचे वितरण करण्यात आले.

या वेळी सरपंच प्रशांत मलवाडे, उपसरपंच बालाजी मनदुमले, सोसायटीचे व्हाइस चेअरमन देवानंद पल्ले, ह. भ. प. महादेव महाराज पल्ले, महेबुब पठाण, हबीबसाब पठाण, विपीन गवरे, बालाजी वाघमारे, राहुल गरड, ज्ञानोबा पडीले, ऋ षिकेश सगर, परमेश्वर समदर्गे यांच्यासह गावातील निराधार व नागरिक आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय गांधी योजना सदस्य हरीश बोळंगे यांनी केले तर सूत्रसंचालन लातूर जिल्हा काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे सरचिटणीस कमलाकर अनंतवाड व आभार प्रदर्शन महाराष्ट्र प्रदेश ओबीसी काँग्रेसचे सहसचिव हरीभाऊ गोणे यांनी केले.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या