30.6 C
Latur
Friday, May 14, 2021
Homeलातूरशिरुर अनंतपाळ नगर पंचायतीची विविध करापोटी १ कोटी थकीत; थकबाकीदारांची नावे फलकावर...

शिरुर अनंतपाळ नगर पंचायतीची विविध करापोटी १ कोटी थकीत; थकबाकीदारांची नावे फलकावर जाहीर होणार

एकमत ऑनलाईन

शिरूर अनंतपाळ : शहरातील कुटूंबांकडे विविध सेवांबाबतचा कोट्यवधींचा कर थकित असून ही थकबाकी वसूल करण्यासाठी नगर पंचायतच्यावतीने धडक वसुली मोहीम राबविण्यात येत असून करदात्यांनी थकीत व चालू कर त्वरीत भरणा करावा अन्यथा थकबाकीदारांची नावे फलकावर जाहीर करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी सचीन भुजबळ यांनी सांगितले.

शिरूर अनंतपाळ नगर पंचायतने थकीत कर वुसलीसाठी विशेष मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे. यासाठी नगरपंचायतच्या वतीने मुख्याधिकारी सचीन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली पथक प्रमुख अंतर्गंत लेखापाल गायकवाड व्ही.एन.,कर निर्धारक नंदाने एल.एल. व कर्मचा-याचे संयुक्त वसुली पथक नेमण्यात आले असून थकबाकीदारांसह चालू करदात्यांकडे कर भरणा करण्यासाठी धडक मोहिम राबविण्यिात येत आहे. त्यामुळे करदात्यांनी आपला कर भरणा करून होणारी कार्यवाही टाळावी असे आवाहन मुख्याधिकारी सचीन भुजबळ यांनी केले आहे.

शहरातील कुटूंबांकडे विविध सेवांबाबतचा सुमारे १ कोटी १५ लाख रुपयांचा चालु व कर थकित आहे. यात शिक्षणकर १ लाख ३४ हजार, चालू मालमत्ता कर ३८ लाख ७६ हजार, पाणीकर ७५ लाख २० हजार, रोजगार हमी कर १७ हजार रुपये चालु थकबाकी वसूल करण्यासाठी नगर पंचायतच्यावतीने मोहीम राबविण्यात येत आहे. या अंतर्गंत नागरिकांना कर भरण्याचे आवाहन करण्यात आले असून त्याची पर्वा न करणा-या करदात्यांची नावे शहरात विविध ठिकाणी फलक लावून व स्पीकरद्वारे जाहीर करण्याचेही नगर पंचायत प्रशासनाने ठरविले आहे.

नगर पंचायतच्यावतीने शहरातील नागरिकांना सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी विविध प्रकारची कर आकारणी करण्यात येते परंतु सुविधांचा लाभ घेणारे अनेक लोक कराचा भरणा करण्यासाठी चालढकल करीत असल्याचे निदर्शनास आले आहे.त्यात कोरोनाच्या संकटामुळे कर मोठ्या प्रमाणात थकले आहे.यासाठी नगर पंचायतने थकीत कर वुसलीसाठी विशेष मोहिम राबविण्यास सुरुवात केली आहे.या अंतर्गंत थकबाकीदारांची नावे विविध चौकांत फलकाद्वारे प्रसिद्ध करण्याचेही नगरपंचायतने ठरविले आहे. त्यामुळे थकबाकीदारांचे धाबे दणाणले आहे.

नव्या ३५ कोरोना बाधितांची भर २८ जणांना सुट्टी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,495FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या