लातूर : जिल्ह्यातील २१ महाविद्यालयांतील १ हजार २४३ अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांचे अर्जच सादर न केल्याने शिष्यवृत्ती थांबली आहे. वारंवार सुचना करुनही महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांचे अर्ज सादर केले जात नसल्याचा प्रकार घडत आहे.
जिल्ह्यातील शिष्यवृत्तीपासून वंचित असलेल्या व दहा पेक्षा कमी अर्ज सादर केलेल्या महाविद्यालयांची नावे पुढील प्रमाणे आहेत. शारदा नर्सिंग स्कूल, लातूर -१५४, कस्तुराबाई नर्सिंग स्कूल, उदगीर -७२, डी. बी. इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट ऍन्ड रिसर्च कॉलेज महारंग्रा -६४, एमडीए स्कूल ऑफ फार्मसी कोळपा -५३, राजीव गांधी
आरजीएनएम नर्सिंग स्कूल उदगीर -४३, श्री भगवान नर्सिंग स्कूल लातूर -२८, पुष्पाई नर्सिंग स्कूल अहमदपूर-२०, लातूर कॉलेज ऑफ फार्मसी लातूर -२०, महात्मा फुले बी. एड. व एम. एड. जळकोट-२०, कै. महांिलगस्वामी नर्सिंग स्कूल लातूर -२०, बालाघाट पॉलिटेक्नीक रुध्दा -१५, ग्रामीण प्रायव्हेट आय. टी. आय. घरणी -१५, सरोजनी नायडू नर्सिंग स्कूल चाकूर -१५, जिजामाता नर्सिंग स्कूल लातूर -१४, धन्वंतरी आयुर्वेद मेडिकल कॉलेज उदगीर -१४ , माऊली कॉलेज बी. फार्मसी तोंडार-१४, चन्नाबसवेश्वर फार्मसी कॉलेज लातूर -१३, पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतन लातूर १२, विवेक वर्धिनी कॉलेज देवणी -१०, श्री व्ही.डी. देशमुख एम. सी. ए. कोळपा -१०, भिवराई नर्सिंग स्कूल लातूर १० विद्यार्थी.