23.8 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeलातूरराष्ट्रीय लोकअदालतीच्या माध्यमातून १ हजार ३११ प्रकरणे निकाली

राष्ट्रीय लोकअदालतीच्या माध्यमातून १ हजार ३११ प्रकरणे निकाली

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या आदेशा प्रमाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, लातूर व जिल्हा व सत्र न्यायालय, लातूर येथे प्रलंबित व वादपुर्व प्रकरणांचे राष्ट्रीय लोकआदलतीचे आयोजन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा न्यायमुर्ती सुरेखा कोसमकर यांच्या मार्गदर्शनाखाली दि. १३ ऑगस्ट रोजी करण्यात आले होते. त्यात १ हजार ३११ प्रकरणे निकाली काढण्यात आली.

सदरील राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये मोटार अपघात नुकसान भरपाई प्रकरणे, कौटुंबिक न्यायालय व ग्राहक मंच प्रकरणे, भुसंपादन, लवाद, हिंदू विवाह कायदा अंतर्गत प्रकरणे, कलम १३८ एन. आय. अ‍ॅक्टची प्रकरणे, कौटुंबिक हिंसाचार प्रकरणे व कोर्टात प्रलंबीत असलेले तडजोडपात्र दिवाणी व फौजदारी प्रकरणे ठेवण्यात आलेली होती. तसेच वादपुर्व प्रकरणामध्ये सर्व बँकाची वसुली दावे, वित्त संस्था तसेच भ्रमणध्वनी कंपनी भारत संचार निगम लिमिटेड यांची रक्कम वसुली प्रकरणे, पोलीसांची वाहतुक ई-चलना बाबतची प्रकरणे ठेवण्यात आलेली होती.

या राष्ट्रीय लोकअदालती मध्ये इश्नोंरन्स कंपन्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. युनिवर्सल सॅम्पो जनरल इन्षोरन्स कंपनीने एम. ए. सी. पी. क्रं. ४५/२०२२ (ज्योती व इतर, कासीर आणि २ व इतर) या प्रकरणामध्ये पक्षकार ज्योती नागेश चौधरी, विनय नागेश चौधरी, वैभव नागेश चौधरी व सुर्यकला सुर्यकांत चौधरी हे वादी व प्रतीवादी कासीर हुसेन शेख व मोहम्मद अब्दुल बरी अब्दुल रब हुसैन व युनिवर्सल सॅम्पो जनरल इश्नोंरन्स कंपनी हे होते. युनिवर्सल सॅम्पो जनरल इश्नोंरन्स कंपनीने १ कोटी १५ लाखाची नुकसान भरपाई दिली. या प्रकरणात वादीचे वकील अ‍ॅड. पी. टी. रेड्डी व प्रतिवादीचे वकील अ‍ॅड. एस. जी. डोईजोडे यांनी काम पाहिले. तसेच इश्नोंरन्स कंपन्यांचे वकिल अ‍ॅड. एस. व्ही. तापडिया, अ‍ॅड. के. जी. देषपांडे, अ‍ॅड. एस. जी. दिवाण, अ‍ॅड. एस. जी. डोईजोडे, अ‍ॅड. जे. पी. चिताडे व वादीचे वकील अ‍ॅड. पी. टी. रेड्डी, अ‍ॅड. एन. जी. पटेल व एस. के. पटेल यांनी राष्ट्रीय लोक अदालतीला उत्स्फुर्तपणे प्रतिसाद दिला. तसेच आय. सी. आय. लंबोर्ड कंपनीचा ही राष्ट्रीय लोकअदालतीला चांगला प्रतिसाद मिळाला.

या वर्षातील तिस-या राष्ट्रीय लोकअदालतीच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यात एकुण १ हजार ३११ प्रकरणे निकाली निघाली असल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव श्रीमती एस. डी. अवसेकर यांनी दिली आहे. या लोकअदालतीला पक्षकारांचा चांगला प्रतिसाद मिळाला. लोकअदालतीचे पॅनेल जिल्हा न्यायालयातील दोन इमारतीत, जिल्हा विधीज्ञ संघ, लातूर तसेच न्यायालयाच्या परिसर येथे विभागण्यात आले होते. या लोकअदालतमध्ये पॅनलवर अ‍ॅड. शिवाजी फड, अ‍ॅड. एस. बी. आयनिले, अ‍ॅड. बी. पी. राजमाले, अ‍ॅड. सुचिता कोंपले, अ‍ॅड. एस. एस. वैकुंठे, अ‍ॅड. यु. एन. राउत, अ‍ॅड. बी. व्ही. गवळी, अ‍ॅड. एस. जी. जगदाळे, अ‍ॅड. व्ही. आर. पाटील, अ‍ॅड. अशोक सोनसाळे, अ‍ॅड. एमडी. ए. एम. मनियार, अ‍ॅड. प्रजाता इनामदार, अ‍ॅड. यु. पी. नाईक, अ‍ॅड. सुनैना बायस, अ‍ॅड. गुरुसिध्द मिटकरी यांनी पॅनल पंच म्हणुन कामकाज पाहिले.

लोकअदालतीसाठी जिल्ह्यातून एकूण ३८ पॅनलद्वारे कामकाज पार पाडण्यात आले. यात लातूर तालुक्यातील पॅनलवर न्या. आर. बी. रोटे, न्या. जे. एम. दळवी, न्या. श्रीमती आर. एम. कदम, असे जिल्हा न्यायाधीश, न्या. पी. बी. लोखंडे, न्या. के. एम. कायंगुडे, न्या. एस. एन. भोसले, न्या. जे. सी. ढंगळे, न्या. पी. टी. गोटे, न्या. ए. एस. मुंडे, न्या. के. जी. चौधरी, न्या. पी. एस. चांदगुडे असे दिवाणी न्यायाधीश व. स्तर, न्या. श्रीमती आर. एच. झा, न्या. श्रीमती जे. जे. माने, न्या. एम. डी. सैंदाने, न्या. श्रीमती ए. एम. शिंदे, असे दिवाणी न्यायाधीश, क. स्तर यांनी पॅनल प्रमुख म्हणुन कामकाज पाहिले. ९ोकन्यायालय यशस्वी करण्यासाठी श्रीमती एस. डी. अवसेकर सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, लातूर, सर्व न्यायाधीश, जिल्हा वकिल मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. विठ्ठल व्ही. देशपांडे, उपाध्यक्ष अ‍ॅड. किरणकुमार एस. किटेकर, सचिव अ‍ॅड. दौलत एस. दाताळ, महिला उपाध्यक्ष अ‍ॅड. संगिता एस. इंगळे, महिला सहसचिव सुचिता व्ही. कोंपले व इतर पदाधिकारी, तसेच जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. रांदड, न्यायालयीन कर्मचा-यांनी परिश्रम घेतले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या