26.9 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeलातूरनिलंगा तालुक्यात आत्तापर्यंत १० जण कोरोनाचे बळी

निलंगा तालुक्यात आत्तापर्यंत १० जण कोरोनाचे बळी

एकमत ऑनलाईन

निलंगा : निलंगा शहरांमध्ये १४ कंटेनमेंट झोन’मध्ये २५ अ‍ॅक्टिव पॉझिटीव्ह रुग्ण तर तालुक्यातील १५ गावांमध्ये ३७ असे एकूण तालुक्यात ६२ कोरोना बाधित अ‍ॅक्टिव रुग्ण असून दहा रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याचे उपविभागीय अधिकारी विकास माने यांनी सांगितले.

निलंगा शहरासह तालुक्यात कोरोनाचा शिरकाव वाढतच आहे . दि १० जुलै ते २३ जुलै दरम्यान निलंगा शहरात ३९ कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण होते. त्यातील उपचारादरम्यान तीन रुग्णाचा मृत्यू झाला असून ११ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत तर आज रोजी शहरात २५ अ‍ॅक्टीव्ह पॉझीटीव्ह रुग्ण आहेत. यामुळे शहरातील दत्त नगर , बसवेश्वर नगर , बावेश्वर मंगल कार्यालयाजवळ , खतीब गल्ली , बँक कॉलनी अडत लाईन, माळी गल्ली, पेठ, औरंगपुरा, ज्ञानेश्वर नगर, शिवाजीनगर या भागातील १४ ठिकाणी प्रशासनाकडून कंटेनमेंट झोन जाहीर करून सील करण्यात आला आहे.

तर तालुक्यातील १५ गावांमध्ये ५४ रुग्णांचे कोरोना पॉझिटीव अहवाल आले होते. यातील पंधरा रुग्ण उपचारानंतर बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे तर गौर , औराद शहाजानी व हाडगा येथील प्रत्येक गावातील एका व्यक्तीचा अशा तीन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामुळे ग्रामीण भागात ३७ अ‍ॅक्टीव पॉझिटीव्ह रुग्ण आहेत . यात औराद शहाजानी येथे चार, दापका दहा, बोरसुरी चार, उस्तुरी चार, नणंद तीन तर चिलवंतवाडी, कोरळी, मंन्थपूर, शिऊर या प्रत्येक गावात दोन व बडूर, गुंजरगा, पानचिंचोली या प्रत्येक गावात एक असे एकूण १५ गावात ३७ अ‍ॅक्टिव पॉझिटीव्ह रुग्ण आहेत.

यामुळे निलंगा तालुक्यात ९३ कोरोना पॉझीटीव्ह रूग्ण होते . त्यातील २७ रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून शहरात २५ व ग्रामिण भागातील १५ गावात ३७ असे एकूण तालुक्यात ६२ अ‍ॅक्टीव्ह पॉझिटीव्ह रूग्ण असल्याचे उपजिल्हाधिकारी विकास माने यांनी सांगितले.

निलंगा चार कोरोनाचे चार बळी
आजतागायत निलंगा शहरातील चार रुग्णांचा कोरोना संसर्गामुळे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे .तालुक्यातील मदानसुरी येथील दोन, गौर एक , औराद शहाजानी एक, औंढा एक, हाडगा एक असे एकूण तालुक्यातील दहा रुगणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याचे उपविभागीय अधिकारी विकास माने यांनी सांगितले.

Read More  देवणीत लॉकडाऊनचा बोजवारा; कोरोना संख्येत वाढ

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या