24.4 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeलातूरचाकूर तालुक्यात २२ सोसायट्यांची शंभर टक्के वसुली

चाकूर तालुक्यात २२ सोसायट्यांची शंभर टक्के वसुली

एकमत ऑनलाईन

चाकूर : लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चाकूरच्या वतीने बँकस्तरावर शंभर टक्के वसुली झालेल्या संस्था व चेरमन आणि गटसचिवांचा सत्कार चाकुर मध्यवर्ती बँक शाखेत करण्यात आला होता.अध्यक्षस्थानी एन.आर.पाटील होते. तर प्रमुख पाहूणे म्हणून अ‍ॅड.हेमतराव पाटील, विलासराव पाटील, चंद्रकांत मद्दे, रामराव बुदरे, पप्पू शेख,भागवत फुले हे उपस्थित होते.

चाकुर तालुक्यात अकरा शाखा आहेत. ४३ सोसायट्या आहेत. त्यापैकी २२ सोसाट्यांंना २०२१-२२ मध्ये १०० वसुली करणा-या सहकारी सोसायटीच्या चेअरमन आणि गटसचिवांचा सत्कार करण्यात आला.सहकारमहर्षि दिलीपराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा बँकेने विविध योजना राबविल्या आहेत. त्यामुळेच ही बँक महाराष्ट्रात अग्रगन्य सहकारी संस्था म्हणून नावारूपास आली आहे. जिल्हा बँकेच्या सहकार्यानेच शेतक-याच्या जीवनात आर्थिक क्रांती आली आहे. चाकुर तालुक्याने शंभर टक्के वसुली करून अभिमानास्पद कार्य केले असल्याचे एन.आर.पाटील यांनी सांगितले.

तालूकाध्यक्ष विलासराव पाटील, जेष्ठ नेते चंद्रकांत मद्दे, रामराव बुदरे,हेमतराव पाटील यांनीही समोयोचित भाषणे केली. तालुक्यातील नागदरवाडी ,तिवटघाळ, सुगाव,घरणी, घारोळा ,जानवळ,रायवाडी,महळंगी,नांदगाव,शिवणखेडबु.शिवणी,हाळी खू.मोहनाळ, वडवळ ना.बेलगाव, हाडोळी,हाणमंतजवळगा,जढाळा,झरी बु.,आटोळा,कबनसांगवी,डोगंरज,या संस्थानी शंभर टक्के वसुली केली आहे. यावेळी कार्यक्रमांस गंगाधर केराळे,.रणजीत पाटील, शमीन कोतवाल,बाळू इरवाणे, तालुक्यातील विविका सोसायटीचे चेअरमन गटसचिव उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ए.एच.तांदळे,आय.एस पवार,बी.बी.हुरगुंडे,आर.जी पुरी,ए.एन. आवाळे,आय. सी.पठाण,व्ही.पी,केंद्रे,जी.एम.बडे,एस.एस.मोहीते,एम.एस.राठौड आदींनी परिश्रम घेतले. सुञसंचलन सलीम तांबोळी यांनी केले तर आभार शिंंदे तानाजी यांनी मानले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या