32 C
Latur
Friday, April 23, 2021
Homeलातूरलातूर शहरातील १०० ज्येष्ठ नागरिकांनी घेतली लस

लातूर शहरातील १०० ज्येष्ठ नागरिकांनी घेतली लस

एकमत ऑनलाईन

लातूर : साठ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक तसेच ४५ ते ६० वर्षादरम्यानचे दीर्घकालीन आजार असलेल्या व्यक्तींच्या लसीकरणास दि. १ मार्चपासून सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी लातूर शहरातील १०० ज्येष्ठ नागरिकांनी येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत जाऊन लस घेतली.

लातूर महानगरपालिका क्षेत्राची लोकसंख्या चार ते साडेचार लाख एवढी आहे. या एकुण लोकसंख्येच्या एक चतुर्थांश म्हणजेच २५ टक्के लोकसंख्या ही ज्येष्ठ नागरिकांची धरली जाते. त्यानूसार सुमारे एक लाख ज्येष्ठ नागरिकांना कोरोनाची लस दिली जाईल, अशी माहिती लातूर महानगरपालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. महेश पाटील यांनी दिली. ते पुढे म्हणाले की, शहरातील ४५ ते ५९ वयोगटातील नागरिकांचा डाटा सध्या उपलब्ध नाही. ज्येष्ठ नागरिकांना लसीकरण करण्यासाठी सरकारच्या वतीने नवीन पोर्टल सुरु करण्यात आले आहे. हे नवीन पोर्टल दुपारी १२ वाजेपर्यं बंदच होते. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणाच्या कामात विलंब झाला. दुपारनंतर पोर्टल सुरु झाले आणि पहिल्याच दिवशी शहरातील १०० ज्येष्ठ नागरिकांनी लस घेतली.

ज्येष्ठ नागरिकांसाठी लसीकरणाची मोहीम सुरु झालेली असली तरी या पूर्वी सुरु असलेली हेल्थ वर्कर्स व फ्रंट लाईन वर्कर्सची लसीकरण मोहीम तशीच सुरु राहणार नाही. ज्यामुळे ज्या हेल्थ वर्कर्स व फ्रंट लाईन वर्कर्सची नोंदणी यापूर्वी झालेली नव्हती अशा वर्कर्सचीही नोंदणी करुन त्यांना लस उपलब्ध करुन दिली जाणार आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी लसीलकरण मोहीम सुरु झालेली आहे. या लसीकरणासाठी नोंदणी आणि थेट असे दोन पर्याय सरकारने ठेवले आहेत. परंतू, ज्येष्ठ नागरिकांनी आपली गैरसोय टाळण्यासाठी व एकचवेळी गर्दी टाळण्यासाठी लसीकरण केंद्रावर थेट येण्यापेक्षा आपल्या घरीच बसून लसीकरणासाठी पोर्टलवर नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले. विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणास प्रारंभ झाला. त्यावेळी महापौर विक्रांत गोजमगुंडे, उपमहापौर चंद्रकांत बिराजदार, मनपा आरोग्याधिकारी डॉ. महेश पाटील यांची उपस्थिती होती. यावेळी उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांनी लस घेतली. लस दिल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांस अर्धा तास निरीक्षण कक्षात ठेवण्यात येत असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. शीला पवार यांनी दिली.

अपायमेंटसाठी ५० टक्के कोटा
उपलब्ध लसीकरण केंद्रांवर ज्येष्ठ नागरिकांची गर्दी उसळू नये यासाठी सरकारने पोर्टल सुरु केले आहे. थेट लसीकरण केंद्रांवर जाऊन नोंदणी करण्यापेक्षा आपापल्या घरुनच पोर्टलवर नोंदणी करुन अपायमेंट घेण्याची सुविधा आहे. त्यासाठी ५० टक्के कोटा ठेवण्यात आल्याचे डॉ. महेश पाटील यांनी सांगीतले.

शहरात आणखी दोन केंद्रांची मागणी
लातूर शहरात सध्या विलासराव देशमुख शासकीय विज्ञान संस्थेत तसेच शहरातील परवानगी दिलेल्या खाजगी रुग्णालयात ज्येष्ठ नागरिकांसाठी लसीकरणाची सोय आहे. परंतू, शासनस्तरावर शहरात पटेल चौकातील मनपाचे पंडित नेहरु रुग्णालय व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र मंठाळेनगर दोन ठिकाणी लसीकरण केंद्राची मागणी करण्यात आली आहे.

अशी करावी नोंदणी
– कोविड अ‍ॅप, आरोग्य सेतू किंवा cowin.gov.in या संकेत स्थळावर जा.
– तुमचा मोबाईल क्रमांक टाका ओटीपी आल्यावर तुमचे अकाऊंट तयार करा.
– नाव, वय, लिंग यांची माहिती भरा आणि ओळखपत्र अपलोड करा.
– ४५ ते ५९ या वयोगटात असल्यास आजारांबाबतचे डॉक्टरांचे प्रमाणपत्र जोडा.
– केंद्र आणि तारीख निवडा
– एका मोबाईल क्रमांकावरुन चार जणांची नोंदणी शक्य

इतर पर्याय
– लसीकरण केंद्रावर थेट जाऊन नोंदणी शक्य
– १५०७ या क्रमांकावर नोंदणी शक्य.

कंगनाला जामीनपात्र वॉरंट जारी; जावेद अख्तर प्रकरण

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,483FansLike
172FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या