लातूर : प्रतिनिधी
चालू गळीत हंगामात मांजरा साखर परिवाराने लातूर तालुक्यातील बोकन गाव येथील ऊस उत्पादक शेतक-यांच्या ऊसाचे १०० टक्के गाळप केले आहे. त्याबद्दल ऊस उत्पादक शेतक-यांनी मांजरा साखर परिवाराचे आभार मानले तसेच सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांचा सत्कार केला.
मांजरा साखर परिवारातील साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक सभासद, बिगर सभासद शेतक-यांच्या सर्वच ऊसाचे गाळ करण्याचे नियोजन मांजरा साखर परिवाराचे प्रमुख सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याचे वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख, लातूर ग्रामीणचे आमदार धीरज विलासराव देशमुख यांनी केले आहे. त्यानूसार कार्यक्षेत्रातील सर्वच ऊस उत्पादकांच्या ऊसाचे गाळप करणे सुरु आहे. या नियोजनानूसार लातूर तालुक्यातील बोकनगाव येथील ऊसाचे १०० टक्के गाळप मांजरा परिवारातील साखर कारखान्यांनी केल्याबद्दल बोकनगाव ऊस उत्पादक शेतक-यांच्या वतीने सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांचा सत्कार करुन मांजरा परिवाराचे आभार व्यक्त करण्यात आले.
यावेळी बोकनगाव सोसायटी नुकतीच बिनविरोध निवडून आल्याने माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांचा सत्कार सोसायटीचे चेअरमन मधुकरराव पाटील, अॅड. श्रीरंग दाताळ, धनराज दाताळ, संचालक मंडळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संचालक धनराज दाताळ, मधुकर पाटील, अॅड. श्रीरंग दाताळ, बंडू शिंदे, विजयकुमार शिंदे, किशोर दाताळ, तानाजी दाताळ, संभाजी दाताळ, बालाजी दाताळ, वैजनाथ राघू, दिलीप सुतार, दशरथ चींते, धोडिराम दाताळ, समर्थ दाताळ, सचिन दाताळ, राजाराम
शिंदे, विलास पाटिल आदी मान्यवर उपस्थित होते.