26.6 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeलातूरतीन दिवसांत लावली १०० झाडे

तीन दिवसांत लावली १०० झाडे

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
रोटरी क्लब ऑफ लातूर मिडटाऊनच्या पुढाकारातून व भारत विकास परिषदेच्या सहकार्याने अवघ्या ३ दिवसात वड आणि पिंपळाची १०० झाडे लावण्यात आली. शहरातील संत तुकाराम नॅशनल मॉडेल स्कूल, मिलिंद महाविद्यालय व मातोश्री वृद्धाश्रमात ही झाडे लावण्यात आली. रोटरी क्लब ऑफ लातूर मिडटाऊनचे माजी अध्यक्ष विष्णुदास तोष्णीवाल यांचे पुत्र सीए जगदीश तोष्णीवाल यांचा वाढदिवस व विशाल अयाचित यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त अयाचित यांचे मित्र, अंकुर नर्सरीचे संचालक धनंजय राऊत यांनी १०० झाडे भेट दिली. ती झाडे इथे लावण्यात आली. लग्नाच्या वाढदिवसानिमित्त विशाल अयाचित यांनी अन्नपूर्णा योजनेला ९ हजार १०० रुपये देऊन एका व्यक्तीचे पालकत्व एक वर्षासाठी स्वीकारत असल्याचे जाहीर केले.

संत तुकाराम नॅशनल मॉडेल स्कूलमध्ये संचालक मैंदर्गे व शिक्षक कर्मचारी, मिलिंद महाविद्यालयात कार्याध्यक्ष अंगदराव तांदळे, संचालिका जयश्री माने यांची वृक्षारोपण प्रसंगी प्रमुख उपस्थिती होती. मिलिंद कॉलेजमधील कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ. राजाराम दावणकर यांनी केले तर व्यवसाय शिक्षण विभागाचे प्राचार्य संजय जगताप यांनी आभार मानले. मातोश्री वृद्धाश्रमात व्यवस्थापक कासले व नोगजा यांचीही वृक्षारोपण प्रसंगी उपस्थिती होती. या उपक्रमात रोटरी क्लब ऑफ लातूर मिडटाऊनचे अध्यक्ष वीरेंद्र फुंडीपल्ले, सचिव डॉ. श्रीनिवास भंडे, सहसचिव अमोल दाडगे, प्रल्हाद बंडापल्ले, अमोल बनाळे, रवींद्र बनकर, प्रा. दावणकर, श्रवण बियाणी, डॉ. राजगोपाल तापडिया, अनिल टाकळकर, किशन कुलेरिया, भूषण दाते, गिरीश पेन्सलवार यांनी सहभाग घेतला.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या