15.7 C
Latur
Wednesday, January 26, 2022
Homeलातूर४६ लघू प्रकल्पांमध्ये १०० टक्के पाणी साठा

४६ लघू प्रकल्पांमध्ये १०० टक्के पाणी साठा

एकमत ऑनलाईन

लातूर : यंदाच्या पावसाळ्यात लातूर जिल्ह्याच्या सरसरीपेक्षा अधिक पाऊस पडला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील १३२ लघू प्रकल्पांपैकी ४६ लघू प्रकल्पांमध्ये १०० टक्के पाणी साठा झाला आहे. जिल्ह्यातील ८ मध्यम प्रकल्पांपैकी देवर्जन व साकोळ हे प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. असे असले तरी अद्यापही ९४ प्रकल्प जोत्याखालीच आहेत. या प्रकल्पात पाणी साठा होण्यासाठी आता परतीच्या पावसावरच भिस्त आहे.

लातूर जिल्हा तसा पर्जन्य छायेखालील जिल्हा म्हणून ओळखला जातो. त्यामुळे मान्सूनच्या लहरीपणाचा फटका सातत्याने लातूर जिल्ह्याला बसत आला आहे. कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टी अशा नैसर्गीक आपत्तीला लातूर जिल्ह्याला सामोरे जावे लागते. यंदा मात्र चांगला पाऊस पडला. जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस होऊनही जिल्ह्यातील सर्वच प्रकल्पात पाणी साठा मुबलक झाला असे नाही. जिल्ह्यात सगळीकडे सारखा पाऊस पडलेला नाही. काही महसुल मंडळात अतिवृष्टी झाली तर काही महसुल मंडळात जेमतेम पावसाची नोंद झालेली आहे. त्यामुळे कुठे ओला दुष्काळ तर कुठे जेमतेम पाऊस अशी परिस्थिती दिसून येत आहे.

लातूर जिल्ह्यातील चिंचोली जोगण, कार्लातुंगी, सारोळा, येल्लोरी, खुंटेगाव, पिंपरी, गुरधाळ, निडेबन, दवणहिप्परगा, गुडसूर, कोनाळी, चांदेगाव, धसवाडी, सोनखेड, कोपरा किनगाव, कौंडगाव, येस्तार, येलदरी, ढाळेगाव, हदगळ-गुगदळ, अहमदपूर, अंधोरीे, उगिलेवाडी, सावरगाव थोट, हंगेवाडी, बोकणी, दवणहिप्परगा, दरेवाडी (क), वडमुरंबी, गुरनाळ, आनंदवाडी, लासोना, ढोरसांगवी, हावरगा, धोंडवाडी, सोनाळा, डोंगरगाव गुत्ती क्रमांक १, २, नागलगाव, नागदरी, नागझरी, रावणकोळा, माळहिप्परगा, चेर क्र. २, डोंगरकोनाळी आदी ४६ लघू प्रकल्प भरले आहेत.

जिल्ह्यातील तावरजा, व्हटी, रेणापूर, तिरु, देवर्जन, साकोळ, घरणी व मसलगा हे आठ मध्यम प्रकल्प आहेत. या आठ मध्यम प्रकल्पांत ४४.२९ टक्के पाणी साठा झाला आहे. ११५ लघू प्रकल्पांमध्ये १९६.३१ दलघमी तर अन्य १३ लघू प्रकल्पांत ९.५१६ दलघमी पाणी साठा झाला आहे. एकंदर जिल्ह्याच्या वार्षिक सरासरीपेक्षा अधिक पाऊस होऊनही जिल्ह्यातील अनेक प्रकल्प अद्याप भरलेले नाहीत. ४६ लघू प्रकल्प आणि दोन मध्यम प्रकल्प भरले आहेत. असमतोल पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच प्रकल्प अद्यापही भरु शकलेले नाहीत. आठ मध्यम प्रकल्पांपैकी देवर्जन आणि साकोळ हे दोन प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. मसलगा प्रकल्प ७५ टक्के भराला आहे. घरणी ४७.४९, तिरु ४२.५०, रेणापूर २४.४७ टक्के भरला आहे. व्ही २.४८ टक्क्यांवर आहे तर तावरजा प्रकल्पात अद्यापी शुन्य टक्के पाणी साठा आहे.

२१६ बाधितांची भर तर चार जणांचा मृत्यू

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या