25 C
Latur
Friday, January 22, 2021
Home लातूर १० हजार नागरिकांनी नवीन खाती उघडली

१० हजार नागरिकांनी नवीन खाती उघडली

एकमत ऑनलाईन

लातूर : लॉकडाऊन काळात इंडिया पोस्ट बॅकेने ऑनलाईन सुविधांमध्ये केलेल्या अमूलाग्र बदलामुळे ग्राहकांना व्यवहारासाठी आधार मिळाला. जवळपास १० हजार ५ नागरीकांनी नवीन खाती उघडील असून बहुतांश रोजगार हमी योजना व शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा यामध्ये समावेश आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्राहक आपल्या घरातच मोबाईल बँकिंग अ‍ॅपद्वारे व्यवहार करीत आहेत. लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यांत इंडिया पोस्ट बँकेमध्ये जवळपास ४८ हजार ३७५ ग्राहकांनी नोंदणी केली आहे. पोस्ट बँकेतर्फे रोख पैसे काढणे, पैसे हस्तांतरण , बिल भरणा, थेट लाभ हस्तांतरण, लाभार्थ्यांना पैसे देणे, आधार अवलंबित पेमेंट सेवा, ई-मेलद्वारे खात्याची माहिती, पैसे पाठविण्यासाठी आंनलाईन सुविधा, बचत खात्याची संदेशाद्वारे माहिती, पोस्ट् ऑफिस बचत खात्याला आयपीपीबी खाते जोडण्याची योजना उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

तसेच ग्रामस्तरावर घरपोच सेवा दिली जात असल्याने ग्राहकांनी लॉकडाऊन काळात पोस्ट पेमेंट बँकेला प्रतिसाद दिल्याचे चित्र आहे. पोस्ट विभागाच्या वतीने दर्जेदार सुविधांवर भर देण्यात आला असून पोस्ट पेमेंट बँकेच्या माध्यमातून ऑनलाईन व्यवहार सुरु करण्यात आले आहेत.

लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात अनेकांनी नोंदणी केली आहे. २ सप्टेबर २०१८ रोजी पोस्ट पेमेंट बँकेने व्यवहार सुरु केले होते. चांगली सुविधा मिळाल्याने ग्राहकांचा समाधानकारक प्रतिसाद असल्याचे उस्मानाबाद, लातूर पोस्ट विभागाचे अधीक्षक यांनी सांगीतले.

तलवार कोणाविरुद्ध उपसणार ? विजय वडेट्टीवार यांचा खासदार संभाजीराजेंना सवाल

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,415FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या