27.7 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeलातूरउजेड जिल्हा परिषद शाळेचे शंभरीत पदार्पण

उजेड जिल्हा परिषद शाळेचे शंभरीत पदार्पण

एकमत ऑनलाईन

शिरुर अनंतपाळ : (शकील देशमुख)
शाळा ही सर्वांगीण विकासाचा पाया भक्कम करणारे एक माध्यम आहे तसेच नवनवीन गोष्टी येथे शिकवल्या जातात. शाळेमुळे बौद्धिक, सामाजिक, मानसिक, शारीरिक व नैतिक विकास होत असतो. याच गोष्टी घेऊन पुढे जात हिसामाबाद जिल्हा परिषद शाळेने शंभरीत पदार्पण केले आहे. त्यानिमित्त शताब्दी महोत्सव साजरा करण्यात येत आहे. स्वातंत्र्यपूर्व १९२३ साली स्थापन झालेल्या जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा हिसामाबाद या शाळेने गुणवत्ता पूर्ण शिक्षण देत शताब्दी वर्षात पदार्पण केले आहे. या शाळेने उजेडसह परिसरातील हजारो बालकांना शिक्षण व संस्कार दिले आहेत.

यातील हजारो विद्यार्थी आज विविध क्षेत्रांत नाव कमावले आहेत. दरम्यान महात्मा गांधी यांची यात्रा भरविणा-या हिसामाबाद उजेड येथील जिल्हा परिषद शाळेच्या स्थापनेला शंभर वर्ष पूर्ण झाली आहेत. तत्कालीन निजाम सरकारने स्थापन केलेल्या या शाळेची सरकारी शाळा अशी पूर्वीची ओळख. त्या काळी उर्दू,मोडी,मराठी भाषेतून पहिल्या पिढीने शिक्षण घेतले. तसेच या शाळेत सत्तरच्या दशकात संगीत ज्ञान ही दिले जात होते. यासाठी गावचे जमीनदार चाँद पटेल यांनी तजवीज केली होतीे. तर शाळेसाठी यशवंतराव पाटील यांनी जागा उपलब्ध करून दिली होती. स्वातंत्र्यपूर्वी व नंतर या शाळेने गुणवत्ता कायम ठेवली आहे. तत्कालीन उस्मानाबाद जिल्ह्यातील गुणवत्तापूर्ण शाळा असा या शाळेचा लौकिक राहिला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या