21.4 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeलातूर१०५ जणांनी घेतला ‘बुस्टर ’

१०५ जणांनी घेतला ‘बुस्टर ’

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
समाजासाठी योगदान देणा-या पत्रकार, जि. प. अधिकारी, कर्मचा-यांचे आरोग्य चांगले राहवे यासाठी लातूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने पत्रकार, जि. प. अधिकारी, कर्मचा-यांसाठी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त बुस्टर डोसच्या शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात ४४ महिलांनी तर ६१ पुरूषांनी अशा प्रकारे १०५ जणांनी बुस्टर डोस घेतला.

पत्रकार, जि. प. अधिकारी, कर्मचा-यांच्यांसाठी व त्यांचे नातेवाईक यांच्यासाठी कोविड बूस्टर डोस किंवा राहिलेला डोस यासाठी विशेष डोस शिबिर बुधवार दि. १० ऑगस्ट रोजी लातूर जिल्हा परिषदेच्या सभागृहात आयोजित केले होते. यावेळी जिल्हा परीषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभू जाधव, उप मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन दाताळ, उप मुख्य कार्यकारी दत्तात्रय गिरी, शिक्षणाधिकारी विशाल दशवंत, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच. व्ही. वडगावे, कृषी विकास अधिकारी सुभाष चोले, जिल्हा पशुसंवरधन अधिकारी डॉ. राजकुमार पडीले आदी उपस्थित होते.

१५० जि. प. अधिकारी, कर्मचा-यांची आरोग्य तपासणी
जि. प. अधिकारी, कर्मचा-यांच्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर ठेवण्यात आले होते. यावेळी १५० अधिकारी व कर्मचारी यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यात रक्ताच्या सर्व चाचण्या, मधूमेह, लघवी, कोलेस्ट्रोल आदी तपासण्या करण्यात आल्या. या तपासणीत यात ५५ जणांना उच्चरक्तदाब, ३२ जणांना मधूमेह, २ जणांना अस्थमा असल्याचे निदर्शनास आल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच. व्ही. वडगावे यांनी सांगीतले.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या