29.9 C
Latur
Friday, January 21, 2022
Homeलातूर१० वी व १२ वी चे वर्ग नियमित सुरू राहणार

१० वी व १२ वी चे वर्ग नियमित सुरू राहणार

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
शासनाने इयत्ता १ ली ते १२ पर्यंतचे ऑफलाईन वर्ग वाढत्या कोरोनामुळे बंद करून ते ऑनलाईन करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र यात बदल करत इयत्ता १० वी व १२ वी च्या बोर्डाचे व शालेय शिक्षण विभागाचे आवश्यक शैक्षणिक कार्यक्रम व शालेय प्रशासकीय कामकाज नियमितपणे चालू राहील, अशी सुचना शिक्षण विभागाने सर्व शाळा व महाविद्यालयांना दिली आहे.

कोरोना ओमिक्रॉन विषाणूच्या व बाधितांच्या वाढत्या पार्श्वभूमीवर दि. १० जानेवारी ते १५ फेब्रुवारी या कालावधीत इयत्ता १ ली ते १२ वी च्या सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळा बंद राहतील. सदर कालावधीत विद्यार्थ्यांना शाळेत समक्ष बोलावून वर्गाध्यापन होणार नाही. तथापी १०० टक्के शिक्षक शाळेत नियमित हजर राहतील. ज्या शाळांची शिक्षक अस्थापना ५० शिक्षकांपेक्षा अधिक आहे. त्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी शिक्षकांचे शाळेत येणेबाबतचे नियोजन दिवसनिहाय किंवा सत्रनिहाय करावयाचे आहे. जेणेकरून कोव्हिड नियमांचे उल्लंघन होणार नाही. शिक्षकांनी विहीत कार्यालयीन वेळेत पूर्णवेळ शाळेत उपस्थित राहणे बंधनकारक करण्यात आले आहे.

इयत्ता १० वी व १२ वी बोर्डाचे व शालेय शिक्षण विभागाचे आवश्यक शैक्षणिक कार्यक्रम व शालेय प्रशासकीय कामकाज नियमितपणे चालू ठेवण्याच्या सुचना शिक्षण विभागाने दिल्याने सदर वर्ग ऑफलाईन सुरू राहणार आहेत. तर इयत्ता १ ली ते ९ वीच्या विद्यार्थ्यांना दीक्षा अ‍ॅप व विविध ई-लर्निंग अ‍ॅप च्या मदतीने तसेच स्मार्टफोन असलेल्या पालकांच्या पाल्यांना व्हाट्सअ‍ॅप ग्रुपद्वारे ऑनलाइन शिक्षण देण्यात यावे. तर स्मार्टफोन नसलेल्या पालकांच्या पाल्यांसाठी गृहभेटी, पालकभेटी, शिक्षक मित्र इ. माध्यमातून शिक्षण चालू ठेवावे. ऑनलाइन शिक्षणाचे सर्व मुख्याध्यापक व शिक्षकांनी लेखी नियोजन तयार करावे. दैनंदिन अध्ययन-अध्यापनाच्या नोंदी ठेवाव्यात. ज्या शाळेतील विद्यार्थ्यांचे लसीकरण असेल त्या दिवशी नियोजनाप्रमाणे विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित ठेवून लसीकरण पूर्ण करून घेण्यात यावे, अशा सुचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत.

पालकांच्या व शिक्षकांच्या मागणीनुसार ऑफलाईन वर्ग
४वाढत्या कोरोना रूग्ण संख्येमुळे ऑनलाईन वर्ग सुरू करण्याचा निर्णय झाला होता. मात्र पालकांच्या व शिक्षकांच्या मागणीनुसार इयत्ता १० वी व १२ वी चे वर्ग ऑफलाईन घेण्याचा निर्णय झाला असून तशा सुचना सर्व शाळा व महाविद्यालयांना दिल्या आहेत. तसेच इयत्ता १० वी व १२ वी च्या बोर्ड परिक्षा जवळ आल्या आहेत. त्यामुळे ज्या ठिकाणी ५० पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्या शाळा, महाविद्यालयाने दोन सत्रात, वर्ग खोल्यांच्या उपलब्धतेनुसार वर्ग भरवण्याच्या सुचना दिल्या आहेत. ज्या विद्यार्थ्यांचे लसीकरण झाले नाही. त्यांचे तात्काळ करून घ्यावे. शाळांनी लसीकरण, सॅनिटायझर भर देवून बोर्ड परिक्षेच्या संदर्भाने विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर व परीक्षेवर परिणाम होऊ नये अशा सुचनाही शाळांना दिल्याची माहिती लातूर जि. प. च्या माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांनी दिली.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या