21.9 C
Latur
Wednesday, November 25, 2020
Home लातूर ११ कोविड केअर सेंटर तात्पुरते बंद

११ कोविड केअर सेंटर तात्पुरते बंद

एकमत ऑनलाईन

लातूर : जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत घट होत चाललेली असून उपचाराने बरे होणा-या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे कोविड-१९ अंतर्गत कोविड रुग्णांच्या उपचारासाठी सुरु करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटर पैकी अनेक सेंटरमध्ये सद्यस्थितीत रुग्ण नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील ११ कोविड केअर सेंटर दि. २६ ऑक्टोबरपासून पुढील आदेशापर्यंत तात्पुरत्या स्वरुपात बंद करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी दिली आहे.

सद्यस्थितीमध्ये जिल्ह्यात दि. २५ ऑक्टोबर रोजी च्या कोविड रिपोर्टनुसार ९०९ कोरोना बाधित रुग्ण उपचार घेत आहेत. यातील ४८२ रुग्ण हे शासकीय व खाजगी रुग्णालयात उपचार घेत असून उर्वरित ४२७ रुपये गृह विलगीकरणात आहेत. त्यामुळे लातूर जिल्ह्यातील अनेक कोविड केअर सेंटरमध्ये रुग्ण नाहीत, अशी माहिती संबंधित कोविड केअर सेंटरचे नोडल अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी निर्देश आणून दिली असल्याने ते ११ कोविड केअर सेंटर तात्पुरते बंद करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी दिले.

लातूर जिल्ह्यात माहे एप्रिल २०२० पासून ते दि. २५ऑक्टोबर या कालावधीत एकूण १९ हजार ९६० कोरोना बाधित रुग्ण आढळून आले यापैकी १८ हजार ४६३ रुग्ण उपचाराने बरे होऊन घरी गेले तर ५८८ रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. तसेच सद्यस्थितीत ९०९ रुग्ण उपचार घेत आहेत यापैकी ४८२ रुग्ण हे विविध शासकीय व खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत तर ४२७ कोरोना बाधित रुग्ण हे गृह विलगीकरणात आहेत. मागील काही दिवसापासून लातूर जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येपेक्षा उपचाराने बरे होणा-या रुग्णांच्या संख्येत रोज लक्षणीय वाढ झालेली दिसून येत आहे.

त्यामुळे रोजची बाधित रुग्णांची संख्या घटत चाललेली आहे. परंतु लातूर जिल्ह्यातील नागरिकांनी कोरोनाची रुग्ण संख्या जरी कमी होत असली तरी कोरोना आजार पूर्णपणे संपलेला नाही याची जाणीव ठेवावी. तसेच शासन व प्रशासनाने कोरोनाच्या प्रतिबंधासाठी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे नियमित तंतोतंत पालन करावे. त्यामुळे पुढील काही काळात लातूर जिल्हा हा पूर्णपणे कोरोना मुक्त होण्यास मदत होणार आहे. तरी जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी तोंडाला मास्क लावणे, हात स्वच्छ धुणे व सुरक्षित अंतर पाळणे या मार्गदर्शक सूचनांचे नियमित पालन करावे व कोरोनाला दूर ठेवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी केले आहे.

कंत्राटी कर्मचा-यांच्या सेवा संपुष्टात
कोविड-१९ साथरोग नियंत्रण उपचार करण्यासाठी उपरोक्त नमूद केलेल्या ११ कोविड केअर सेंटरमध्ये तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी पद्धतीने अधिकारी व कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आलेली होती. तरी दि. २६ ऑक्टोबरपासून कार्यालयीन वेळेनंतर उपरोक्त सर्व ११ केअर सेंटर व त्या अंतर्गत नियुक्त केलेल्या कंत्राटी अधिकारी व कर्मचा-यांच्या सेवा संपुष्टात येत आहेत. तथापि भविष्यात उपरोक्त केंद्र पुन्हा सुरु केल्यास सद्यस्थितीमध्ये कमी करण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचा-यांना पुन्हा तात्पुरत्या स्वरुपात नियुक्ती देण्यात येणार आहे.

हे कोविड सेंटर झाले तात्पुरते बंद
-जयहिंद पब्लिक स्कूल, उदगीर.
-समज कल्याण वस्तीगृह, देवणी.
-संभाजी केंद्रे अध्यापक महाविद्यालय, जळकोट.
-समाजकल्याण वस्तीगृह, लामजना ता. औसा.
-जाऊ, निलंगा.
-समाज कल्याण वसतिगृह बावची ता. रेणापूर.
-मुलींची शासकीय निवासी शाळा, मरशिवणी अहमदपूर.
-बिडवे इंजिनिअंिरग कॉलेज लातूर.
-दयानंद कॉलेज होस्टेल लातूर.
-शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतन, बार्शी रोड, लातूर.
-पुरणमल लाहोटी मुला-मुलींचे वस्तीगृह, लातूर.

५००० हेक्टर क्षेत्राचे नुकसान

ताज्या बातम्या

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचे निधन

नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांनी वयाच्या 71 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. करोनाची लागण झाल्याने त्यांच्यावर गुरुग्राम येथील मेदांता...

पदवीधरांच्या भाजपा मेळाव्यात कार्यकर्त्यांची गर्दी

लातूर : मराठवाडा पदवीधर मतदार संघ भाजपा व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या प्रचारार्थ लातूर जिल्हा भाजपाच्या वतीने दि. २४ नोव्हेंबर रोजी...

धुमाळ यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

कासार सिरसी (नागेश पंडित ) : निलंगा तालुक्यातील नेलवाड येथील भारतीय सैन्य दलातील जवान अर्जुन (लखन) किसनराव धुमाळ (वय २४) हे कश्मीर खो-यात दोन...

क्रिकेटमध्येही घराणेशाही!

मुलाने आपली गादी चालवावी असे प्रत्येक बापाला वाटणे हा मानवी स्वभाव आहे. किमान भारतीयांना तरी तसे वाटू शकते. अर्थात याला अपवादही असू शकतात. डॉक्टरच्या...

अनमोल हिरा

कोरोनाच्या साथीने आपल्यातून हिरावून नेलेला आणखी एक अनमोल हिरा म्हणजे ख्यातनाम बंगाली अभिनेते सौमित्र चटर्जी. सहजसुंदर अभिनयासाठी ते जितके ख्यातकीर्त होते, त्याहून अधिक ख्याती...

ऑनलाईन सहशालेय शिक्षण

देशासह राज्यात कोविड-१९ या आजाराचा शिरकाव होताच मार्च महिन्यात सर्वत्र लॉकडाऊन सुरू झाले. यामुळे शाळांना सुटी मिळाली व ती देखील अनिश्चित कालावधीसाठी वाटू लागली....

आयुर्वेदाचा विस्तार गरजेचा

गेल्या काही महिन्यांपासून आरोग्यविषयक चिंता वाढल्याने तसेच वाढत्या आव्हानांमुळे संबंधित तज्ज्ञ आणि संस्थांचे लक्ष पुन्हा एकदा पारंपरिक चिकित्सा प्रणालींच्या उपयुक्ततेकडे वळले आहे. आधुनिक जीवनशैलीमुळे...

धानउत्‍पादक शेतक-यांना प्रतिक्‍विंटल ७०० रूपयांचा बोनस !

मुंबई,दि.२४ (प्रतिनिधी) धानउत्‍पादक शेतक-यांना दिलासा देण्यासाठी केंद्राच्या दराव्यतिरिक्‍त प्रतिक्‍विंटल ७०० रूपये बोनस देण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. यामुळे धानउत्‍पादक शेतक-याला २...

राज्‍यात पुन्हा लॉकडाउन करण्याबाबत कोणतीही चर्चा नाही – राजेश टोपे यांचे स्पष्टीकरण

मुंबई,दि.२४ (प्रतिनिधी) देशातील अन्य राज्‍यांच्या तुलनेत महाराष्‍ट्रातील परिस्‍थिती निश्चितच समाधानकारक आहे. त्‍यामुळे राज्‍यात लॉकडाऊन करण्याची सध्यातरी गरज नाही. तशी चर्चाही झालेली नाही. मात्र काही...

जयसिंगराव गायकवाड यांचा राष्‍ट्रवादीत प्रवेश

मुंबई,दि.२४ (प्रतिनिधी) स्व. प्रमोद महाजन व गोपीनाथ मुंडे यांचे एकेकाळचे खंदे सहकारी व भाजपचे माजी खासदार जयसिंगराव गायकवाड यांनी भाजपाला सोडचिठठी देऊन राष्‍ट्रवादी काँग्रेसमध्ये...

आणखीन बातम्या

पदवीधरांच्या भाजपा मेळाव्यात कार्यकर्त्यांची गर्दी

लातूर : मराठवाडा पदवीधर मतदार संघ भाजपा व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या प्रचारार्थ लातूर जिल्हा भाजपाच्या वतीने दि. २४ नोव्हेंबर रोजी...

धुमाळ यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

कासार सिरसी (नागेश पंडित ) : निलंगा तालुक्यातील नेलवाड येथील भारतीय सैन्य दलातील जवान अर्जुन (लखन) किसनराव धुमाळ (वय २४) हे कश्मीर खो-यात दोन...

शिरूर अनंतपाळ नगर पंचायत मधील भ्रष्टाचाराची चौकशी करावी. महाविकास आघाडी तर्फे महामोर्चा काढून कुलूप बंद आंदोलन

शिरूर अनंतपाळ :- नगर पंचायत मधील भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात यावी, यासाठी महाविकास आघाडी तर्फे दि. २४ नोव्हेंंबर मंगळवार रोजी सकाळी ११ वाजता राष्ट्रवादी काँग्रेस...

सेलू (खु.) येथे पंपावरील डिझेल चोरीचा प्रयत्न फसला

रेणापूर : रेणापूर-खरोळा या रस्त्यावर सेलू (खुर्द) येथे असलेल्या पेट्रोल पंपावर काही अज्ञात चोरट्यांनी रविवार दि २२ नोव्हेबर रोजीच्या मध्यरात्री पंपावरील डिझेल. चोरी होत...

लातूर जिल्ह्यात वीज बिलाची होळी

रेणापूर : भरमसाठ वीजबिलाबाबत नागरिकांना रास्त सवलत द्यावी या मागणीसाठी भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार रमेश कराड यांच्या मार्गदर्शनाखाली व भाजपाचे रेणापूर तालुकाध्यक्ष अ‍ॅड दशरथ सरवदे...

८२ टक्के शाळांतून १२.५ टक्के विद्यार्थी उपस्थित

लातूर : राज्य सरकारच्या आदेशानूसार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व सुरक्षा उपायांची अंमलबजवणी करुन दि. २३ नोव्हेंबर लातूर जिल्ह्यातील शाळा सुरु झाल्या. आठ महिन्यांनंतर शाळेची घंटा...

रुमा बचत गटाच्या गोधडीची ‘अ‍ॅमेझॉन’वर भरारी

लातूर : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत ‘उमेद’च्या माध्यमातून निलंगा तालुक्यातील अनसरवाडा येथील रुमा हा बचत गट पारंपरिक हस्तकारी गोधडी बनविण्याचा व्यवसाय करते....

सात दिवसानंतर निघणार सौदा

लातूर : लातूर आडत बाजार गेल्या सात दिवसापासून हमालांच्या हमाली दर वाढीवरून बंद आहे. रविवारी झालेल्या बैठकीत आडत बाजार सुरू ठेवून वाटाघाटी करून हमालीच्या...

‘रामकली’ रागाने दिवाळी पहाट बनली सुरेल

लातूर : यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे दिवाळी पहाट या सुरम्य अशा सुरेल अशा सांगीतिक मेजवानीला रसिक मुकणार की काय अशी भीती मनात होती. परंतु लातूर...

निलंग्यातील पोलिस कर्मचारी राजकुमार लोखंडे यांचे निधन

निलंगा : औसा येथील उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयातील तरुण पोलिस कर्मचारी आणि निलंगा येथील माळी गल्ली येथील रहिवासी राजकुमार शिवाजीराव लोखंडे (३३) यांचे शनिवार...
1,347FansLike
121FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...