22.9 C
Latur
Sunday, September 26, 2021
Homeलातूरजळकोट तालुक्यात ११ नवे कोरोनाबाधित

जळकोट तालुक्यात ११ नवे कोरोनाबाधित

एकमत ऑनलाईन

जळकोट : जळकोट तालुका हा कोरोना मुक्तीच्या दिशेने वाटचाल करीत होता. काही दिवसात तालुक्यातून कोरोना महामारी हद्दपार होईल असे वाटत होते परंतु तालुक्यात कोरोनाचे रुग्ण संख्या वाढतच आहे. सद्यस्थितीत तालुक्यात ११ कोरोना रुग्ण आहेत. त्यांच्यावर घरीच उपचार करण्यात येत आहेत. विशेष म्हणजे ग्रामीण भागात कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. अनेक ठिकाणी काळजी घेत नसल्याचे दिसून येत आहेत. येणा-या काळात अशीच परिस्थिती राहिली तर जळकोट तालुक्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढणार आहे.

जळकोट तालुक्यात आजपर्यंत कोरोनामुळे बारा जणांचा बळी गेलेला आहे तसेच तालुक्­यात ४२९ जणांना कोरोनाची लागण झाली होती, यापैकी ४०६ जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले तर सद्यस्थितीत ११ कोरोनाचे रुग्ण उपचार घेत आहेत. विशेषता जे रुग्ण आहेत ते सर्व ग्रामीण भागातील आहेत. सध्या मोठ्या प्रमाणात लग्न तसेच विविध कार्यक्रमांची रेलचेल मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पूर्वीप्रमाणेच आता मोठे लग्न होत आहेत. त्यामुळे एकाच ठिकाणी अनेक नागरिक असल्यामुळे, अशा ठिकाणी कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता आहे.

विशेष म्हणजे लग्न समारंभामध्ये अनेक नागरिक है मास्कचा वापर करीत नसल्याचे दिसून येत आहे तसेच आठवडी बाजारामध्येही नागरिक मास्कचा वापर न करता बिनधास्तपणे फिरत असल्याचे दिसून येत आहे. शासन घरी कोणाची दुसरी लाट येण्याची शक्यता आहे, असे सांगत असले तरी, नागरिक मात्र यास गांभीर्याने घेत नसल्याचे दिसून येत आहे.

नागरीकांनी मास्कचा वापर करावा
गावांमध्ये नेहमीप्रमाणे विवाह होत आहेत तसेच अनेक इतर कार्यक्रमही होत आहेत, कार्यक्रमाच्या ठिकाणी गेल्यानंतर त्या ठिकाणी सुरक्षित अंतर ठेवणे गरजेचे असून, तोंडाला सतत मास्क लावणे गरजेचे आहे , मास्क हेच सद्यस्थितीला एक प्रकारे लसी सारखे काम करते .जळकोट तालुक्यात यापूर्वी कार्यक्रमांमधून मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग झाला होता. यापुढे असा संसर्ग टाळायचा असेल तर विवाह समारंभ तसेच अन्य कार्यक्रम व बाजारपेठेमध्ये फिरताना मास्कचा वापर करावा.
-डॉ .संजय पवार तालुका आरोग्य अधिकारी
-डॉ . जगदीश सुर्यवंशी वैद्यकीय अधीक्षक

राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३ टक्क्यांवर

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या