27.8 C
Latur
Thursday, October 21, 2021
Homeलातूर‘सीएस’कडे ११ हजार तर मनपाकडे १५ हजार अँन्टीजन टेस्ट किट उपलब्ध

‘सीएस’कडे ११ हजार तर मनपाकडे १५ हजार अँन्टीजन टेस्ट किट उपलब्ध

एकमत ऑनलाईन

लातूर : कोव्हिड-१९ ची तपासणीसाठी रॅपीड अ‍ॅन्टीजन टेस्ट किट व व्हायरल ट्रॉन्सपोर्ट मिडिया उपलब्ध आहेत. सध्या जिल्हा शल्यचिकित्सक, लातूर येथील औषधी भंडारात रॅपीड अ‍ॅन्टीजन टेस्ट किट १० हजार ९०० तसेच व्हायरल ट्रॉन्सपोर्ट मिडिया ६ हजार २०० तर लातूर महानगरपालिकेच्या औषधी भंडारात रॅपीड अँन्टीजन टेस्ट किट १४ हजार ७०० व व्हायरल ट्रॉन्सपोर्ट मिडिया ४ हजार ८०० उपलब्ध आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लातूर जिल्ह्यात रॅपीड अ‍ॅन्टीजन टेस्ट मोठ्या प्रमाणात केल्या जात आहेत. जिल्ह्यात दररोज हजारो रॅपीड अ‍ॅन्टीजन टेस्ट केल्या जात आहेत. प्रारंभीच्या काळात जिल्हा प्रशासनाने व्यापारी, उद्योजक, विविध क्षेत्रातील अधिकारी, कामगार, कर्मचार-यांना रॅपीड अ‍ॅन्टीजन टेस्ट अनिवार्य केले होते. सक्तीने ही टेस्ट केली जात होती. त्यामुळे यास मोठा प्रतिसादही मिळत गेला.

रॅपीड अ‍ॅन्टीजन टेस्ट केंद्रांवर रांगा लावून नागरिकांनी रॅपीड अ‍ॅन्टीजन टेस्ट करुन घेतल्या. त्यानंतर नागरिक स्वत:हून रॅपीड अ‍ॅन्टीजन टेस्ट करुन घेत असल्यामुळे रॅपीड अ‍ॅन्टीजन टेस्ट कीटचा तुटवडा काही काळ जाणवला. आता ज्यांना कोरोनाची लक्षणे आहेत, अशाच नागरिकांची रॅपीड अ‍ॅन्टीजन टेस्ट केली जात आहे. सध्या लातूर जिल्ह्यात कोव्हिड -१९ साठीच्या तपासणीसाठी रॅपीड अ‍ॅन्टीजन टेस्ट किट व व्हायरल ट्रॉन्सपोर्ट मिडिया यांचा तुटवडा नसल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक तथा कोरोना नोडल ऑफिसर डॉ. संजय ढगे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

महापालिकेच्या रॅपिड अँटीजेन चाचण्या सुरळीत
लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने शहरातील कोरोना संसर्ग कमी करण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या चाचणी मोहिमेअंतर्गत नागरिकांनी शहरातील पाचपैकी एखाद्या केंद्रावर जाऊन तपासण्या करुन घ्याव्यात, असे आवाहन महापालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. या केंद्रावर रॅपिड अँटीजेन चाचण्या केल्या जातात. ज्या नागरिकांना थंडी- ताप, सर्दी, खोकला, दम लागणे यासारखी कोरोनाची लक्षणे दिसत आहेत फक्त त्यांनीच शहरातील पाच पैकी एखाद्या केंद्रावर जाऊन आपली चाचणी करुन घ्यावी.

तसेच समाजकल्याण व पुरणमल लाहोटी कोवीड केअर सेंटर या ठिकाणी आरटीपीसीआर चाचणीसाठी केवळ स्वॅब जमा करण्याचे काम पालिकेकडून केले जाते. जमा केलेले स्वॅब विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तपासणीसाठी पाठवले जातात. दुसरे दिवशी त्याचा अहवाल प्राप्त होतो. तरी नागरिकांनी वेळीच तपासणी करावी, असे आवाहन महापालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

उमरग्यात कोरोना रुग्णसंख्या ११४८ वर तर ३५ जणांचा मृत्यू

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या