26.2 C
Latur
Thursday, August 11, 2022
Homeलातूरपंढरपूर यात्रेसाठी ११५ बसेस धावणार

पंढरपूर यात्रेसाठी ११५ बसेस धावणार

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
जाता पंढरीसी सुख वाटे जीवा, आनंदे केशवा भेटतची, या सुखाची उपमा नाही त्रिभूवणी… या अभंगाप्रमाणे पंढरपूर यात्रेसाठी लातूर जिल्ह्यातून दरवर्षी मोठ्या प्रमाणात भाविक भक्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी जातात. आषाढी वारी करणा-या भाविक-भक्तांची सोय व्हावी, म्हणून एसटी महामंडळाच्या लातूर विभागीय कार्यालयाने ११५ जादा बसेसचे नियोजन केले आहे. या बसेस भाविकांच्या सेवेत धावणार आहेत. आषाढी यात्रा १३ जुलैपर्यत चालणार आहे.

पंढरपूर आषाढीवारी आली की, विठ्ठलभक्तांना वेध लागतात ते विठुरायाच्या भेटीचे. त्यामुळे राज्यभरातील भाविकांसह लातुरातील भाविकभक्तही विठ्ठल-रूक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूरला जातात. कोरोना विषाणूमुळे गेल्या दोन वर्षात पंढरपूर यात्रा झाली नसल्याने अनेक भाविकांना विठूरायाच्या दर्शनाची आस लागली आहे. या भाविकांची सोय व्हावी, म्हणून लातूर विभागीय कार्यालयाने ११५ जादा बसेसचे नियोजन केले आहे. यात लातूर आगारातून ४०, निलंगा आगारातून १६, उदगीर आगारातून २५, औसा आगारातून १७, तर अहमदपूर आगारातून १७ बस दि. ६ ते १३ जुलै या दरम्यान धावणार आहेत.

या यात्रेचे मुख्य दिवस दि. १० जुलै रोजी देवशयनी आषाढी एकादशी व दि. १३ जुलै रोजी गुरू पौर्णिमा असे असणार आहेत. त्यामुळे या पंढरपूर यात्रा कालावधीत १ कोटी ६८ लाख ७ हजार ५०० रुपयांचे उत्पन्न मिळेल, असे नियोजन लातूर विभागीय कार्यालयाने केले आहे. लातूर, औसा, निलंगा, अहमदपूर व उदगीर येथून प्रवाशांना घेवून जाणा-या एसटी बसेस भीमा यात्रा (देगाव) बसस्थानकावर थांबणार आहेत. तसेच लातूर-पंढरपूर या मार्गावर एसटी बसेस सुरळीत चालाव्यात, म्हणून यांत्रिक शाखेच्या ५ कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच एसटी महामंडळाचे प्रशिक्षण वाहनही या ठिकाणी असणार आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या