26.4 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeलातूरशिरूर अनंतपाळ शहरात १२ कोरोनाबाधित रुग्ण

शिरूर अनंतपाळ शहरात १२ कोरोनाबाधित रुग्ण

एकमत ऑनलाईन

शिरूर अनंतपाळ : शहरात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. एकाच दिवशी आठ जणांचे अहवाल पॉझीटीव्ह आले असल्याने शहरातील एकुण बारा एक मयत तर ग्रामीणमधील दोन यांच्यासह पंधरा रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह आढळले आहेत. ११३ जणांचे स्वॅब तपासणीला पाठविण्यात आले असून रुग्ण संख्येत वाढ होत असल्याने शिरूर अनंतपाळकरांची ंिचता वाढली आहे.

शिरूर अनंतपाळ तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून ग्रामीण भागानंतर शहरात कोरोना संसर्गाचा फैलाव झाला आहे. रविवारी पाठवलेल्या स्वॅबपैकी आठ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आलेत तर इतरांचे अहवाल निगेटीव्ह आले असून उर्वरीत रुग्ण लातूरच्या विलगीकरण कक्षात उपचार घेत असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.आर.एच. पवार यांनी दिली.

कोरोनामुक्त असलेल्या शिरूर अनंतपाळ तालुक्यात ग्रामीण भागातून कोरोनाचा संसर्ग आता शहरातही पसरला
आहे. शहरात कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने शहरवासीयांची ंिचता वाढली आहे. शहरात रुग्णांची संख्या १३ झाली असून खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील प्रभाग तीन, आठ, दहा, अकरा,चौदा व प्रभाग पंधरामध्ये कंटेनमेंट झोन तयार करून तो परिसर सिल करण्यात आला आहे. नागरिकांचे प्रबोधन करून त्यांना योग्य त्या सूचना देण्यात आल्याचे स्थानिक प्रशासनाने सांगितले.

गेल्या दोन दिवसात शहरात रुग्णांची वाढती संख्या पाहता नागरिकांनी काळजी घ्यावी व कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कोणी ही घराबाहेर न पडता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन  मुख्याधिकारी सचीन भुजबळ, पोलिस निरिक्षक परमेश्वर कदम यांनी केले आहे.

Read More  मुलांना समजून घ्या, अपेक्षा लादू नका

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या