24.4 C
Latur
Monday, September 20, 2021
Homeलातूर१२ लाख ७० हजार रुपयांचा दंड वसूल

१२ लाख ७० हजार रुपयांचा दंड वसूल

एकमत ऑनलाईन

रेणापूर : कोरोना संसर्गाची दुस-या लाटेची साखळी तोडण्यासाठी राज्य शासनाने लॉकडाऊन घोषणा केली. अत्यावश्यक सेवा वगळता अन्य नागरिकांना घराबाहेर फिरण्यास मनाई असतानाही काही हौशी मंडळी विनाकारण रस्त्यावर दुचाकी वाहनावरून Þिफरत असताना व विना मास्क तसेच अवैध दारूविक्री करण्या-याविरुद्ध गुन्हे दाखल करीत १२ लाख ७० हजार रूपयांचा दंड आकारण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक नानासाहेब उबाळे यांनी दिली.

कोरोना संसर्गाच्या दुस-या लाटेत शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागात कोरोना बाधित कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना साखळी तोडण्यासाठी राज्य शासनाने लॉकडाऊनची घोषणा केली. शासन व प्रशासनाकडून विविध माध्यमातून नागरीकांनी घराबाहेर येऊ नका असे आवाहन करूनही काही हौशी मंडळी विनाकारण फिरत असल्याचे आढळून आल्याने रेणापूर पोलीसांनी पोलीस ठाण्यासमोर मुख्य रस्त्यावर व ंिपपळफाटा चौकात येणा-या जाणा-या गाडयाची चेकींग सुरू केली.

विनाकारण फिरणा-या वाहनावर, विना मास्क फिरणा-यावर, परवानगी नसताना दुकाने सुरू ठेवणा-यावर व अवैध दारूविक्री करणा-यावर दंडात्मक कार्यवाही करीत १२ लाख ७० हजार रूपयांचा दंड वसूल केला. यात दि. १ एप्रिल ते दि. २५ मे २०२१ पर्यंत दारूबंदीचे ३५ गुन्हे दाखल करण्यात आले त्यात ८ लाख ५८ हजार १५८ रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या मुद्देमालात ईनोव्हा या चारचाकी वाहनांचा समावेश आहे. दि. १ जानेवारी ते २४ मे २०२१ या कालावधीत विना मास्क फिरणा-या १ हजार ९१८ जणाकडून २ लाख ४ हजार ६५० रुपयांचा दंड वसूल केला तसेच ५६५ वाहनाविरुद्ध कार्यवाही करून १ लाख ५५ हजार ७०० रुपयांचा दंड आकारण्यात आला. दोन लग्नसमारंभावर कार्यवाही करून २० हजार रूपयांचा दंड वसुल केला.

परवानगी नसताना दुकाने चालु ठेवणा-या २८ दुकानदाराविरुद्ध कारवाई करून ३१ हजार रूपयांचा दंड आकारण्यात आला असल्याची माहिती देऊन विनाकारण फिरणा-या लोकांची रॅपीड अँटीजन कोविड चाचणी करण्यात आली. पोलीस वाहनाच्या माध्यमातून नागरीकांना सावधानतेबाबत आवाहन करण्यात येत असल्याचेही पोलीस निरीक्षक उबाळे यांनी सांगितले

विनाकारण घराबाहेर पडू नका : उबाळे
विनाकारण घराबाहेर पडू नका खरोखरच आवश्यकता असेल तरच घराबाहेर तेवढ्यापुरतेच या आणि घरी थांबा. यापुढे जर विनाकारण फिरणारी गाडी आढळून आली तर त्या वाहनावर कारवाई केली जाईल. वाहन कोणतेही असो वाहनांची कागदपत्रे व वाहन चालवण्याचा परवाना असेल तरच व खरोखर गरज असेल तरच घराबाहेर या अन्यथा घरीच कौटुंबासोबत आनंद घ्यावा असे आवाहनही पोलीस निरीक्षक उबाळे यांनी केले.

कृतज्ञ विलासराव… कृतज्ञ अंतुले…!

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या