29.9 C
Latur
Friday, January 21, 2022
Homeलातूरमांजरा सहकारी साखर कारखान्याच्या कर्मचा-यांना १२ टक्के पगारवाढ

मांजरा सहकारी साखर कारखान्याच्या कर्मचा-यांना १२ टक्के पगारवाढ

एकमत ऑनलाईन

विलासनगर : प्रतिनिधी
येथील विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांना त्रिपक्षीय समितीने जाहीर केलेली १२ टक्के वेतन वाढ माहे डिसेंबर, २०२१ पासून लागू करण्याचा निर्णय सहकार महर्षी, माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या आदेशानुसार संचालक मंडळाने घेतला आहे, अशी माहिती कारखान्याचे व्हाईस चेअरमन श्रीशैल उटगे यांनी दिली आहे. यावेळी संचालक मंडळ, कार्यकारी संचालक जितेंद्र रणवरे, कामगार संघटनेचे अध्यक्ष व कार्यलक्षी संचालक श्रीनिवास देशमुख व पदाधिकारी उपस्थित होते.

कारखान्याचे संस्थापक चेअरमन विकासरत्न विलासराव देशमुख यांनी कामगार हिताचे धोरण राबवले आहे. कारखान्याचे कर्मचारी व व्यवस्थापन यांचे संबंध नेहमीच सलोख्याचे राहिलेले आहेत. त्यासाठी कारखान्याचे मार्गदर्शक, सहकार महर्षी, माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सदैव कामगार हिताचे व प्रगतीचे निर्णय कारखान्याच्या व्यवस्थापनाने वेळोवेळी घेतलेले आहेत तसेच पालकमंत्री अमित विलासराव देशमुख, आमदार धिरज विलासराव देशमुख यांचे सतत मार्गदर्शन लाभलेले आहे. सदरच्या पगारवाढीमुळे कामगार वर्गामध्ये आनंदाचे व सौहार्द्याचे वातावरण आहे. पगारवाढी बद्दल कामगार संघटनेच्या वतीने व्यवस्थापनाचे आभार मानन्यात आले.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या