22.4 C
Latur
Saturday, June 19, 2021
Homeलातूर१३ ऑक्सिजन प्रकल्प उभारणार

१३ ऑक्सिजन प्रकल्प उभारणार

एकमत ऑनलाईन

लातूर : लातूर जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून लातूर जिल्ह्यात १३ ठिकाणी आक्सिजन प्रकल्प उभारले जाणार आहे. परंतू, त्यासाठी केंद्र सरकारच्या अखत्यारीतील ‘सीएसआरआय’ डेहराडून या कंपनीने अ‍ॅडव्हान्स ५० टक्के रकमेची मागणी केली आहे. ५० टक्के रक्कम देण्याची परवानगी जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाने सरकारकडे मागीतली असून ही परवानगी मिळताच येत्या काही दिवसांत जिल्ह्यात १३ ऑक्सिीजन प्रकल्प उभारणीस प्रारंभ होणार आहे.

राज्यात कोरोनाच्या दुस-या लाटेने थैमान घातले आहे. अनेक रुग्णांना ऑक्सिजन मिळत नसल्यामुळे प्राण गमवावे लागत आहेत. भविष्यात अशा संकटांना तोंड देण्यासाठी व आरोग्य यंत्रणा बळकट करण्यासाठी शासनाने ऑक्सिजन प्रकल्प उभारण्यास सुरुवात केली आहे. लातूर जिल्ह्यातील लातूर, निलंगा व उदगीर या तीन ठिकाणी दररोज ५०० सिलिंडर तयार करण्याच्या क्षमतेचे तर ग्रामीण रुग्णालय औसा, ग्रामीण रुग्णालय अहमदपूर, ग्रामीण रुग्णालय किल्लारी, ग्रामीण रुग्णालय कासारशिरसी, ग्रामीण रुग्णालय चाकुर, ग्रामीण रुग्णालय जळकोट, ग्रामीण रुग्णालय देवणी, ग्रामीण रुग्णालय मुरुड, ग्रामीण रुग्णालय बाभळगाव व ग्रामीण रुग्णालय रुग्णालय रेणापूर या दहा ठिकाणी दिवसाला प्रत्येकी १०० सिलींडर तयार होतील, असे ऑक्सिजन प्रकल्प उभारण्याचे नियोजन आहे. त्याचाच एक भाग म्हणुन केंद्रीय पथकाने नूकतेच लातूर शहरातील लेबर कॉलनीतील माता रमाई स्त्री रुग्णालयाच्या परिसरात दि. ६ मे रोजी सायंकाळी पाहणी केली. केंद्रीय पथकासमवेत पाहणी करताना महसूल प्रशासन, महावितरणचे अधिकारी, आरोग्य विभागाचे अधिकारी होते.

जिल्ह्यातील १३ ऑक्सिजन प्रकल्प उभारणीचे काम केंद्र सरकारच्या अखत्यारीतील ‘सीएसआयआर’ डेहराडून ही कंपनी करणार आहे.या कामासाठी या कंपनीने ५० टक्के रक्कम अ‍ॅडव्हान्समध्ये मागीतली आहे. लातूर जिल्हा नियोजन मंडळाकडे निधी उपलब्ध आहे. त्यातून ही ५० टक्के रक्कम सीएसआयआर कंपनीला देण्याबाबत सरकारकडे परवानगी मागीतलेली आहे. सरकारने तशी परवानगी दिल्यानंतर ५० टक्के रक्कम ‘सीएसआयआर’ कंपनीच्या बँक खात्यावर जमा करण्यात येईल. कंपनीच्या बँक खात्यावर ५० टक्के निधी जमा होताच त्या तारखेपासून ४५ दिवसांत जिल्ह्यातील १३ ऑक्सिजन प्रकल्प उभा राहातील, असे कंपनीचे म्हणणे असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एल. एस. देशमुख यांनी दिली. कोरोनाच्या या अतिश्य भयावह काळात प्राणवायुचे (ऑक्सिजन) महत्व किती आहे हे अधोरेखीत झाले आहे. केवळ ऑक्सिजनचा पुरवठा वेळेवर झाला नाही म्हणुन अनेक ठिकाणी जटिल प्रश्न निर्माण झालेले आपण या काळात पाहात आहोत. भविष्यात लातूर जिल्ह्याला ऑक्सिजनच्या टंचाईला सामोरे जाण्याची वेळ येऊ नये, म्हणून जिल्ह्यात तीन मोठे व दहा लहान असे एकुण १३ ऑक्सिजन प्रकल्पाची उभारणी करण्याच्या हलचालींनी वेग घेतला आहे.

३ कोटी ६६ लाखांचा खर्च
लातूर, निलंगा व उदगीर या ठिकाणी उभारण्यात येणा-या मोठ्या ऑक्सिजन प्रकल्पावर १ कोेटी ४५ लाख ८७ हजार ३७२ रुपये तर औसा, अहमदपूर, किल्लारी, कासारशिरसी, चाकुर, जळकोट, देवणी, मुरुड, बाभळगाव व रेणापूर या दहा ठिकाणच्या ऑक्सिजन प्रकल्पांवर एकुण २ कोटी २० लाख असे एकुण ३ कोटी ६५ लाख ८७ हजार ३७२ रुपये खर्च होणार आहे.

जिल्ह्यात अडीच हजार ‘ऑक्सिजन’ सिलेंडरची निर्मिती होणार
लातूर, निलंगा व उदगीर या तीन ठिकाणी दररोज ५०० सिलिंडर तर औसा, अहमदपूर, किल्लारी, कासारशिरसी, चाकुर, जळकोट, देवणी, मुरुड, बाभळगाव व रेणापूर या दहा ठिकाणी दररोज प्रत्येकी १०० सिलेंडर तयार करणारे एकुण १३ प्रकल्प जिल्ह्यात उभे राहिल्यास जिल्ह्यात दररोज अडीच हजार ऑक्सिजन सिलेंडरची निर्मिती होणार आहे. त्यामुळे लातूर जिल्ह्याला ऑक्सिजनचा तुटवडा भासणार नाही.

पालकमंत्री अमित देशमुख यांचे विशेष प्रयत्न
राज्याचे वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या विशेष प्रयत्नातून लातूर जिल्ह्यात १३ ऑक्सिजन प्रकल्प उभारले जाणार आहेत. पालकमंत्री अमित देशमुख व्ही. सी. च्या माध्यमातून जिल्ह्यातील कोविड-१९ चा सविस्तर आढावा घेतात. अडचणी समजून घेतात, अडचणी सोडविण्यासाठी काय करता येईल विचारतात, मदत कोठून व कशी मिळवता येईल, त्यासाठी आवश्यक ते प्रस्ताव सादर करण्याबाबत मार्गदर्शन करतात. जिल्ह्यातील १३ ऑक्सिजन प्रकल्पांच्या उभारणीच्या कामातही पालकमंत्री सहकार्य करीत असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एल. एस. देशमुख म्हणाले.

तिस-या लाटेपूर्वी ऑक्सिजन प्रकल्प उभारण्याचा प्रयत्न
कोरोनाची तिसरी लाट मानवी आरोग्याच्या दृष्टीने अतिश्य खडतर आणि संघर्षमय असणार आहे, असा अंदाज वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. या अंदाजाची शक्यता लक्षात घेता तिसरी लाट येण्यापूर्वी जिल्ह्यात १३ ठिकाणी ऑक्सिजन प्रकल्प उभारणीचा प्रयत्न असणार आहे, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एल. एस. देशमुख म्हणाले.

म्युकरमायकोसीस रुग्णांच्या उपचारासाठी शासकीय रुग्णालयात स्वतंत्र वॉर्ड, विशेषज्ञांचे पथक नेमा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
203FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या