22.4 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeलातूरतिरुका येथे १३१ होम क्वारंटाईन

तिरुका येथे १३१ होम क्वारंटाईन

एकमत ऑनलाईन

जळकोट : जळकोट तालुक्यातील एका किराणा दुकानदारास कोरोला झाल्याचे निष्पण झाले आहे़ किराणा दुकानदारांचा दि २२ जुलै रोजी लातूर येथील एका खाजगी रुग्णालयात मृत्यूही झाला आहे त्यामुळे तिरूका गावात एकच खळबळ उडाली आहे़ तिरूका गावातील तब्बल १३१ जणांना आरोग्य विभागाने होम क्वांरन्टाईन करण्यात आले आहे तसेच संपर्कातील २७ घरे सिल करण्यात आली आहेत.

जळकोट तालुक्यातील एका ८० वर्र्षीय किराणा दुकानदारास आठ दिवसांपूर्वी प्रकृती ठिक नसल्यामुळे खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते परंतु आठ दिवसांच्या उपचारानंतर लातूर येथील एका खाजगी रुग्णालया दि २२ जुलै रोजी रात्री ११.३० वाजता त्यांचे निधन झाले, त्यांना श्वसनाचा त्रास असल्याची माहिती मिळाली आहे, त्यावेळी त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली़ त्यांनतर त्यांचा अहवाल पॉझीटीव्ह आला आहे. त्यांनतर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत कापसे यांनी सदरील रुग्णालयास भेट देऊन संपूर्ण माहिती घेतली.

तिरूका येथील किराणा दुकानदारांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची बातमी समजताच जळकोटचे तहसीलदार संदीप कुलकर्णी, गटविकास अधिकारी चंद्रहार ढोकणे, पोलीस निरिक्षक गणेश सोंडारे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रशांत कापसे यांनी गावास भेट दिली़ तसेच तात्काळ उपाययोजना करण्याचे आदेश दिले़ त्यानंतर किराणा दुकान परीसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषीत करण्यात आले आहे. या ठिकाणी पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.

किराणा दुकानदाराचाच मृत्यू झाल्याने सध्या तिरूका गावात भितीचे वातावरण आहे परंतु प्रशासनाच्या अधिकाºयांनी भेट देऊन तात्काळ उपाययोजना केल्या आहेत़ या ठिकाणी एक वैद्यकीय अधिकारी २४ तास उपलब्ध असणार आहेत तसेच एक अन्य डॉक्टर लक्ष ठेवून आहेत, तसेच एक आशा कार्यकर्ती तसेच १ अंगणवाडीताईही घरोघर जाऊन सर्व्हे करीत आहेत. तिरूका गावातील जळकोट या ठिकाणी ९ जणांचे स्वॅब घेतले जाणार आहेत तर उदगीर येथे दोघांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात येणार आहेत, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत कापसे यांनी दिली.

Read More  तुळजापूर येथे जनता कर्फ्यूस तिस-या दिवशीही मोठा प्रतिसाद

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या