21.1 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeलातूरऔशात हॉटेल मालकावर जीवघेना हल्ला

औशात हॉटेल मालकावर जीवघेना हल्ला

एकमत ऑनलाईन

औसा : औसा शहरातील औसा टी पॉईटकडून मुख्यरस्त्याने जाणारे येथील हॉटेल शितलचे मालक अजय सगरे हे सोमवारी दि २५ जुलै रोजी रात्री पावणे अकराच्या सुमारास हॉटेलकडे जाताना पाठीमागून पाठलाग करीत आलेल्या ज्ञानेश्वर गुंडानाथ सूर्यवंशी व गणेश शिवशंकर गायकवाड या दोन युवकांनी हॉटेल शितलसमोर येताच लोखंडी हत्याराने डोक्यात, हाता पायावर १५ ते २० वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. अजय सगरे यांच्या डोक्यावर वार झाल्याने ते जमिनीवर पडले असताना ज्ञानेश्वर सूर्यवंशी याने वरुन लोखंडी हत्याराने सलग १५ ते २० वार केले तर गणेश गायकवाड यांने पायावर काठीने मारहाण केली.

यावेळी रस्त्यावरून जाणा-या दोन युवकांनी वार करणा-या ज्ञानेश्वर सूर्यवंशी व गणेश गायकवाड यांना बाजूला केले. गंभीर जखमी असलेल्या अजय सगरे यांंना औसा सरकारी रुग्णालयात प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी लातूरला हलविण्यात आले आहे. दरम्यान या प्राणघातक हल्ला प्रकरणाची अजय सगरे यांनी तक्रार दिल्याने ज्ञानेश्वर गुंडानाथ सूर्यवंशी व गणेश शिवशंकर गायकवाड या दोघांविरुध्द औसा पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक बाळासाहेब डोंगरे हे करीत आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या