36.5 C
Latur
Saturday, April 17, 2021
Homeलातूरपाण्याच्या विजेची मनपाकडे १४ कोटी ४० लाख थकबाकी

पाण्याच्या विजेची मनपाकडे १४ कोटी ४० लाख थकबाकी

एकमत ऑनलाईन

लातूर : लातूर महानगरपालिकेने पाणीपुरवठ्याच्या वीजबिलाचे १४ कोटी ४० ला ख रुपये थकवले आहेत. महावितरणच्या वतीने थकबाकी वसुलीची मोहीम राबविली जात आहे. त्यामुळे थकबाकीपोटी महावितरणकडून लातूर शहराच्या पाणीपुरवठ्याचा वीजपुरठा खंडीत करण्याची कारवाई झाली तर शहराच्या पाणीपुरवठ्याची अडचण निर्माण होऊ शकते.

लातूर शहराच्या पाणीपुरवठ्याच्या वीजेची लातूर महानगरपालिकेकडे १४ कोटी ५५ लाख रुपयांची थकबाकी आहे. महानगरपालिकेने दि. १० फेब्रुवारी २०२१ रोजी सप्टेंंबर, ऑक्टोबर व नोव्हेंबर २०२० चे चालू वीजबिल ६५ लाख रुपये भरले होते. डिसेंबर २०२० चे २८.२२ लाख व जानेवारी २०२१ चे २८.५६ लाख रुपये चालू वीजबिलात वाढ झाले. चालु वीजबिलाच्या १४ कोटी ५५ लाखातील ६५ लाख रुपये महापालिकेने भरल्याने शिल्लक वीजबिल १३ कोटी ८३ लाख रुपये राहिले. चालु वीजबिलातील ५७ लाख रुपये वाढल्याने महानगरपालिकेकडे आता महावितरणची पाणी वीजबिलाची थकबाकी १४ कोेटी ४० लाख रुपये आहे.

महानगरपालिकेने पाणी पुरवठ्याच्या वीजबिलाची थकबाकी भरावी म्हणून महावितरणने महानगरपालिकेस दोन नोटीसा बजावल्या. नोटीसांचा कालावधी संपला तरी महानगरपालिकेने पाणीपुरवठ्याच्या वीजबिलाची थकीत रक्कम न भरल्यामुळे महावितरण शहराच्या पाणीपुवठ्याचा वीजपुरवठा खंडीत करण्याची शक्यता असून असे झाले तर शहराच्या पाणीपुवरवठ्याची अडचण होणार आहे.

परस्पर वीज पुरवठा जोडल्यास होणार कारवाई
थकबाकीदार ग्राहकाने थकबाकी न भरता महावितरणची दिशाभूल करुन थकबाकी असलेल्या ठिकाणी वीज पुरवठा घेतल्याचे महावितरण विशेष भरारी पथकाला फेरतपासणीत आढळून आल्यास ग्राहक व जोडूण देणा-या संबंधिताविरूध्द कायदेशिर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासाठी महावितरण कर्मचा-यांचे शाखा कार्यालय, उपविभागीय कार्यालयस्तरावर मीटर फेरतपासणीसाठी पथक नेमण्यात आलेले आहे.

मालोजी राजे गढीसाठी तातडीने निधी उपलब्ध करून देणार – सांस्कृतीक कार्य मंत्री अमित देशमुख

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,476FansLike
168FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या