22.4 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeलातूरजिल्ह्यातील १४०० रुग्णांनी केली कोरोनावर मात

जिल्ह्यातील १४०० रुग्णांनी केली कोरोनावर मात

एकमत ऑनलाईन

लातूर : लातूर जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या २ हजार ५४७ असली तरी उपचार घेऊन बरे होणा-यांचीही संख्या ब-यापैकी आहे.  आतापर्यंत १४०० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर १०४४ रुग्ण उपचार घेत आहेत तर आजपर्यंत १०३ रुग्णांचा दुर्दैवाने मृत्यू झाला आहे. (ही आकडेवारी सोमवारी सायंकाळी ७ वाजेपर्यंची आहे.)

लातूर जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कोरोना विषाणुच्या संसर्गावर प्रतिबंध घालण्यासाठी जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायती प्रशासन पूर्णक्षमतेने काम करीत आहेत. त्या अनुषंगाने लॉकडाऊन जाहीर करुन विविध उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी केली जात आहे. एखादा कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळल्यास त्यास उपचारासाठी दाखल करुन घेत त्याच्या संपर्कातील लोकांना तातडीने शोध घेऊन कोरोना विषाणुचा संसर्ग पसरणार नाही, याची दक्षता घेतली जात आहे. कोरोनाबाधित रुग्णाच्या मुळापर्यंत जाऊन रुग्णांचा शोध घेतला जात आहे.

जिल्ह्यातील ७ हजार ५०९ जणांना घरात अलगीकरण केलेले आहे. ६ हजार १२३ व्यक्तिंनी १४ दिवसांचा कालावधी पुर्ण केला आहे. अद्याप होम क्वॉरंटाईन असलेल्या व्यक्तींची ांख्या १ हजार ३८० इतकी आहे. संस्थात्मक अलगीकरण केलेल्या व्यक्तिंची संख्या ७ हजार २०२ आहे. संस्थात्मक अलगीकरणातील ६ हजार २३१ लोकांनी १४ दिवसांचा कालावधी पूर्ण केलेला आहे. संस्थात्मक अलगीकरणात अद्याप ९७१ व्यक्ती आहेत. जिल्ह्यातील विविध २२ संस्थांमध्ये कोविड उपचार केंद्र सुरु आहेत. या २२ संस्थांमध्ये २९८९ बेड्सची व्यवस्था करण्यात आलेली आहे. भरती रुग्ण संख्या १०२८ इतकी आहे. शिल्लक बेड्स १९६१ इतके आहेत.

मृतात सर्वाधिक कोमोर्बिलीटी रुग्णाचा समावेश
लातूर जिल्ह्यातील १०३ कोरोनाबाधित रुग्णांचा आजपर्यंत मृत्यू झालेला आहे. त्यात सर्वाधिक ८३ कोमोर्बिलीटी असलेल्या रुग्णांचा समावेश आहे. तर २० रुग्ण हे कोमोर्बिलीटी नसलेले आहेत. मृतांमध्ये ७० वर्षांपेक्षा जास्त वय असलेले ४१, ६० वर्षांपेक्षा अधिक वय असलेले ३७, ५० वर्षांपेक्षा जास्त वय असलेले १३ तर ५० वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या १२ रुग्णांचा समावेश आहे.

सौम्य लक्षणाचे १००२ रुग्ण
कोविडची सौम्य लक्षणे असणारे २३५ रुग्ण विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत, ३९ रुग्ण सामान्य रुग्णालय उदगीर, ५१ रुग्ण डॉ. बाबासाहेब आंबेडकर बौद्ध निवासी वसतीगृह तोंडार पाटी, २९९ रुग्ण १ हजार मुला-मुलींचे वसतीगृह १२ नंबर पाटी, ४७ रुग्ण मुलांची शासकीय निवासी शाळा मरशिवणी,९० रुग्ण मुलांची शासकीय निवासी शाळा औसा, १२ रुग्ण उप जिल्हा रुग्णालय निलंगा, ५१ रुग्ण कोविड केअर सेंटर दापका, १८ रुग्ण शासकीय वसतीगृहा न्यु. बिल्डींग देवणी, ४८ रुग्ण कृषी पी. जी. कॉलेज चाकुर, १७ रुग्ण कोविड केअर सेंटर बावची, असे एकुण १००२ सौम्य लक्षणे असणारे रुग्ण उपचार घेत आहेत.

Read More  श्रीरामच्या शिक्षणास मिळाला ‘आधार माणुसकीचा’

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या