लातूर : जेईई अॅडव्हान्स २०२० परीक्षेसाठी शिव छत्रपती शिक्षण संस्थेचे १५८ विद्यार्थी पात्र ठरले आहेत. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी या संस्थेने या परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केले आहे.
जेईइ मेन परीक्षेत शिव छत्रपती शिक्षण संस्थेअंतर्गत येणा-या राजर्षी शाहू ज्युनिअर सायन्स कॉलेज व संत तुकाराम नॅशलन मॉडेल स्कुलमधील २१५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी १५८ विद्यार्थी जेईई-अॅडव्हान्स परीक्षेसाठी पात्र ठरले. ज्यामध्ये ९९ पेक्षा अधिक पर्सेंटाईल गुण घेऊन उर्त्तीण होणा-या विद्यार्थ्यांची संख्या १८ आहे.९८ पेक्षा अधिक पर्सेटाईल गुण घेणारे ३० विद्यार्थी, ९७ पेक्षा अधिक पर्सेंटाईल गुण घेणारे ४३ विद्यार्थी, ९६ पेक्षा अधिक पर्सेटाईल गुण घेणारे ५८ विद्यार्थी, ९५ पेक्षा अधिक पर्सेटाईल गुण घेणारे ६६ विद्यार्थी व ९८ पेक्षा अधिक पर्सेंटाईल गुण घेणारे ९९ विद्यार्थी आहेत.
संस्थेच्या संत तुकाराम नॅशनल मॉडेल स्कुलच्या प्रतिक पृथ्वीराज पवार, सौरभ सोमनाथ घोलप, शिवम् रेवणसिद्धदी खोसे, जयेश ओमप्रकाश लकडे, विवेक ज्ञानेश्वर सुरवसे रोहित भानूदास कोटे, कल्याण भूषण फरकांडेकर या विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन केले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष डॉ. गोपाळराव पाटील, उपाध्यक्ष डॉ. पी. आर. देशमुख, सचिव प्राचार्य अनिरुद्ध जाधव, सहसचिव किशनराव सोनवणे, गोपाळ शिंदे, सर्व संचालक, प्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे, प्राचार्य मैंदर्गी, उपप्राचार्या सुचेता वाघमारे, सीईटी सेल संचालक प्रा. दिलीप देशमुख, मुख्य समन्वयक सतीश पवार, आयआयटी व एम्स् बॅचचे समन्वयक प्रा. विनोद झरीटाकळीकर, पर्यवेक्षक प्रा. एस. आर. बिराजदार व सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
निवृत्त नौदल अधिकाऱ्याला शिवसैनिकांची मारहाण, भाजप आक्रमक !