24.4 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeलातूरदुस-या टप्प्यासाठी १६ कोटी ६५ लाखांचा प्रस्ताव

दुस-या टप्प्यासाठी १६ कोटी ६५ लाखांचा प्रस्ताव

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
पंतप्रधान आवास योजनेंतर्गत लातूर शहर महानगरपालिकेसाठी १ हजार ११० घरांना मंजूरी मिळाली आहे. राज्य शासनाकडुन ११ कोटी १० लाख रुपयांचा पहिला टप्पा प्राप्त झाला आहे. या घरकुलाच्या दुस-या टप्प्यासाठी लातूर शहर महानगरपालिकेने केंद्र शासनाकडे १६ कोटी ६५ लाख रुपयांचा प्रस्ताव दिला आहे. तो प्रस्ताव मंजूर होताच घरबांधणी सुरु होणार आहे.

ज्यांना शहरात जागा आहे, परंतू घर नाही, अशांना ही घरे मंजूर करण्यात आली असून बांधकाम परवाना देण्याबरोबरच कामाचा आदेश देण्याची प्रक्रिया लातूर शहर महानगरपालिकेकडून सुरु झाली आहे. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत लातूर शहर महानगरपालिकेकडून अर्ज मागविण्यात आले होते. ज्यांना स्वत:ची जागा आहे, परंतू छताचे घर नाही. कच्चे घर आहे, अशांकडून प्रस्ताव घेण्यात आले होते. प्रधानमंत्री आवास योजनेसाठी शहरात स्वत:ची जागा असावी ही प्रमुख अट आहे. त्या जागेत छताचे घर नसावे, कच्चे घर असावे. संबंधीत अर्जदाराच्या कुटुुंबाचे उत्पन्न तीन लाखांच्या आत असावे, या अटींची पुर्तता करणा-या लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुले मंजूर केली जातात. त्या अनुषंगाने लातूर शहर महानगरपालिकांतर्गत या योजनेत १ हजार ११० घरे विद्यमान आर्थिक वर्षात मंजूर करण्यात आली आहेत.

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत मंजूर झालेल्या १ हजार ११० घरांपैकी अनेक घरांसाठी कामाचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच काही घरांसाठी बांधकाम परवाना देण्याची प्रक्रिया सुरु आहे. ज्यांना घरकुल मंजूर झाले आहे, त्यांनी तात्काळ बांधकाम परवान्यासाठी तसेच अन्य मंजुरींसाठी अर्ज करावेत, असे आवाहन प्रधानमंत्री आवास योजना विभागातील अधिकारी रुक्मानंद वडगावे यांनी केले आहे. पहिल्या टप्यासाठी राज्य शासनाकडून ११ कोटी १० लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. काही घरकुलांच्या कामाचे आदेश देण्यात आले आहेत तर काही बांधकाम परवाने प्रक्रियेत आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या